वळसंग – दक्षिण सोलापूर येथे श्री चन्नबसवेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून श्री बसवेश्वर यात्रा भव्य दिव्य असे संपन्न होणार आहे. दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ०६.०० वा.गावाच्या मुख्य रस्त्यावरून नंदीध्वज व अंबली कोडा मिरवणूक होईल. दि.१९ एप्रिल रोजी पहाटे ०५.०० वाजता श्री बसवेश्वरांचे मूर्तीस महारुद्राभिषेक,महापूजा विधिवत पुजारी वे. मल्लय्या स्वामी यांच्या कडून संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी ०९.०० वाजता नंदीबैल व पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून होणार आहे.
सायंकाळी ०४.०० वाजता श्री बसवेश्वरांचे पाळणा कार्यक्रम महिला मंडळ कडून संपन्न होईल.सायंकाळी ०६.०० वा.नागफणी, नंदिध्वज,पालखी मिरवणूक होणार आहे.त्याच रात्री श्री बसवेश्वर नाट्य संघ यांच्यावतीने “उत्तमर मनेतना” अर्थार्थ धर्मवंतरू कन्नड नाटक पाहिलं प्रयोग सादर होतील तसेच या नाटकाचे दुसरं प्रयोग दि.२१ एप्रिल मंगळवार रोजी रात्री ०९.३० वाजता चालू होईल.दि.२१ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजे पासून रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे यात युवा वर्ग व सर्व नागरिक,महिलांनी सहकर्या करण्याचे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष मल्लिनाथ बाबानगरे यांनी केले.
या वेळी उपाध्यक्ष अनिल शहापूरे,सचिव चंद्रशेखर केशट्टी,खजिनदार सचिन तडलगी, शिवाबसप्पा कलशेट्टी,शिवानंद घोडके(सर), श्रीशैल भैरामडगी,सोमनाथ केशट्टी,बसवराज किणगी आदी मान्यवर उपस्थित होते.


























