Sunday, June 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली; संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती

तरुण भारतbyतरुण भारत
April 23, 2026
in editor
0
भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली; संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.22) सायंकाळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती आणि हभप, भन्तेजी, मौलानांसह अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांच्या सहभागाने मिरवणुकीचा उत्साह अधिकच वाढला.

गेल्या 25 वर्षांपासून अठरापगड जाती-समूहांना एकत्रित करत बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे यांनी जयंती उत्सव समिती अध्यक्षपदाचा बहुमान सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना दिला आहे. शहरातील क्रांती चौक भीमनगर येथे जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, जयंती समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, समितीचे अध्यक्ष  तथा सांजा गावचे सरपंच प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, विशाल शिंगाडे, जातमुक्त गाव करणारे सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे पाटील, मसूद शेख अ‍ॅड.परवेज काझी, पंकज काटे, बार्शीचे उद्योजक सुनील भराडीया, मौलाना अय्युब कासमी, मौलाना मुफ्ती रहेमतुल्ला, मौलाना जाफर खानसाब, मौलाना सजीयोद्दीन शेख,  मौलाना कारी कलीमसाब, भन्ते सुमेधजी नागसेन, भन्ते कमल धम्मो, भन्ते संघदूत, भन्ते विनीत धम्म, भन्ते सुमित बोधी, हभप प्रकाश बोधले महाराज,  हभप धनंजय महाराज सांजेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.

कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांचा शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान उपस्थित मौलाना, भन्तेजी, हभप यांच्या हस्ते करण्यात आला. तर सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे पाटील, अधीक्षक अभियंता संजय आडे यांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला.

प्रास्ताविकात समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी उत्सव सोहळ्याची पार्श्वभूमी विशद करून संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणार्‍या सामाजिक कार्यक्रमाची माहिती दिली.  तसेच मनोज जरांगे पाटील यांनी दलीत बहुजन समाजाचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी मसूद शेख, समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.

आशीर्वचन मार्गदर्शन हभप प्रकाश महाराज बोधले, मौलाना जाफर महंमदअली खान, भन्ते सुमेधजी नागसेन यांनी केले. जातमुक्क्त गाव संकल्पनेचे प्रेरणास्थान शरद आरगडे पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

अन्यायाची जाणीव झाली तर अन्याय दूर होईल – मनोज जरांगे पाटील 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माचा आदर केला. त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन मी समाजासाठी मैदानात उतरलो आहे 

समाजातील सर्व घटकांमी आपल्यावरील अन्यायाची जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला तर अन्याय दूर होईल. आपल्यावर झालेल्या अन्यायाला दूर करायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लढ्याची जाणीव आपण करून घ्यावी. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी तर आभारप्रदर्शन समितीचे कार्याध्यक्ष सुधीर पवार यांनी केले.

क्रांती चौक भीम नगर येथून शिस्तबद्धपणे, पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापुरुषांना अभिवादन करून परत क्रांती चौक येथे विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीने सर्व धाराशिवकरांचे लक्ष वेधले. मिरवणुकीसाठी बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

धाराशिव शहरात संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच त्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. 

Post Views: 33
Previous Post

भांडण सोडविताना मारहाणीत १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post

आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी दक्ष रहा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी दक्ष रहा

आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी दक्ष रहा

ताज्या बातम्या

ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी

ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी

June 20, 2026

शहरातील ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या – चंदनशिवे, सावंत, मोरे गुन्हे शाखेत

June 20, 2026
श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 20, 2026

शाळांवर अचानक तपासणी; गैरहजर शिक्षकांवर थेट कारवाई

June 20, 2026
मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

June 20, 2026

“विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 20, 2026
प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

June 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0925822

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697