पंढरपूर – आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकरी यांना सुविधा देणे साठी दक्ष रहा. आषाढी यात्रेची तयारी आता पासून सुरू करा. अशा सुचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज दिल्या.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील संत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील धर्मपुरी, खुडूस , कारूंडे, सदाशिवनगर, पुरंदावडे, वेळापूर वाखरी, भंडीशेगाव तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पिराची कुरोली, महाळुंग, बोरगाव, अकलूज, माळीनगर या पालखी मार्गाची व पालखी तळाची पाहणी आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली. या दौरात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, पंढरपूर चे गटविकास अधिकारी अमोल जाधव , माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा कक्षातील वैभव आहाळे उप अभियंता बांधकाम, उप अभियंता पाणी पुरवठा, विस्तार अधिकारी, सरपंच , पंचायत अधिकारी उपस्थित होते.
वाखरी पालखी तळा पासून पाहणी ची सुरूवात करून धर्मपुरी पर्यंत वारकरी यांना देणेत येणारे सुविधांचाही माहिती जाणून घेतली. त्यानंतर संत तुकाराम पालखी मार्गावरील पालखी तळाची पाहणी केली. एका दिवसात दोन पालखी मार्गावरील मुक्कामी व विश्रांतीची ठिकाणावरील पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष,रस्ते, शौचालय व स्नानगृह सुविधासाठी ची जागा, पालखी तळाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत या बाबत ची माहिती घेऊन त्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आतापासून सुविधांची तयारी करणेचे सुचना सिईओ जैन यांनी दिल्या.
सिईओ कुशल जैन यांनी पायी फिरून सर्व पालखी मुक्कामाची ठिकाणे व विश्रांती ची ठिकाणांची पाहणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी पालखी मार्गावर वारकरी यांचे साठी निवारा केंद्र, स्वागत कमानी, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्षातील सुविधांचाही माहिती दिली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी वारकरी यांचे साठी देणेत येणारी मोबाईल टाॅयलेट ( स्वच्छतागृह सुविधा) स्नानगृह, पालखी तळावरील मुक्कामाची सुविधांची माहिती दिली.
—————-
(यंदाची आषाढी यात्रा हायटेक राहणार – सिईओ कुशल जैन)
पालखी मार्गावर वारकरी यांना सुविधा देण्यासाठी संवाद यंत्रणा अती जलद राहिल याची दक्षता घेणेत येत आहे. मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्षात गतवर्षी चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी यांचे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन काळजी घेणेत येत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वारकरी यांचे साठी करणेत येणार आहे. वारकरी यांचे सेवेसाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांचे बरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांची देखील मदत घेणेत येणार आहे.
यात्रपुर्वी यंत्रणेत पडणारा ताण कमी करणेसाठी आता पासून नियोजन व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी नियोजन करणेत येत आहे.





















