अक्कलकोट – तीर्थक्षेत्र श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर परिसर अन्नछत्र मंडळ परिसरात बुधवारी सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविण्यात आली यामध्ये . 54 अतिक्रमण केलीली दुकाने ‘बाह्य वळण रस्त्यावरील ३४ अनधिकृत रहिवाशी घरे जेसीबी ने जमीनदोस्त करण्यात आली .
पोलीस निरिक्षक दिपक भिताडे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या नेतृत्वाखाली १५० पोलीस नपा चे ३० कर्मचारी अधिकारी व ७० सफाई कर्मचारी विद्युत वितरण कंपनी चे कर्मचारी व शासकीय इतर अधिकारी मोठ्या फौज फाट्यासह सर्वात मोठी कारवाई करण्यात आली . मंदिर परिसरात पोलीस व साहित्याची वाहतुक करणारे छोटी वाहने स्क्रैप मलबा पत्रे ‘ रैक बाकडे खुर्ची चा खच पडला होता दुकानदाराची धांदल उडाली होती .
या मोहिमेत ५ जेसीबी पोकलेन दोन दहा ट्रैक्टर दोन हायवा, या फौज फाट्यासह १५० पोलीस़ सहाय्यक रचनाकार नगर पालिका अककलकोट चे शुभम मागुरे ‘ नगर अभियंता अभिषेक काकडे रचना सहाय्यक उत्कर्ष उकरंडे पो नि भिताडे मुख्याधिकारी रमाकांत डाके सहभागी झाले होते . ही मोहिम पुढील दोन दिवस गुरुवार २३ एप्रिल व २४ एप्रिल रोजी ही चालू रा्हणार आहे . नागरिकांनी विना परवाना बांधकाम अतिक्रमण स्वतःहुन काडावे असे आवाहन नपा वतीन करण्यात आल आहे .





















