बार्शी – शहरातील ॲड. शितल गुंड यांची शिवसेना (शिंदे गट) युवती सेवा बार्शी शहराध्यक्ष या पदी नेमणूक करण्यात आलेली होती. दि. १८ एप्रिल रोजी मुंबई येथे शिवसेना शिंदे गटकडून आयोजित ‘महायुवोत्सव’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत पुर्वेश सरनाईक व किरण साळी यांचे सुचनेनुसार प्रियांका परांडे, युवती सेवा राज्य कार्यकारणी सदस्य, पश्चिम महाराष्ट्र यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
महायुवोत्सव कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाव्दारे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
महायुवोत्सव कार्यक्रमात दिपप्रज्वलनाचा मान वरिष्ठ पदाधिकारी यांचेकडून ॲड. शितल गुंड यांना देण्यात आला.
ॲड. शितल गुंड यांनी दिपप्रज्वलनाचा मान मिळाल्यामुळे पक्षाचे तसेच सर्वसामान्य युवतींसाठी अधिक चांगल्या पध्दतीने काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले.






















