अक्कलकोट – माणुस आयुष्यात पुढे गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळतात. सत्कार केले जातात. परंतु आपल्या जन्मभुमीत म्हणजेच आपल्याच गावातील ग्रामपंचायत किंवा नागरिकांनी केलेल्या सत्काराची किंमत लाखमोलाची असते, अशी भावना सर्व सत्कारमुर्तींनी व्यक्त केली.
चपळगांव-बावकरवाडी ग्रामपंचायत परिवार व ग्रामस्थांकडुन गावातील सेवानिवृत्त गुरुजन, पदोन्नती मिळवलेले गुरुजन व कष्ट व जिद्दीच्या बळावर पोलीस दलात भरती मिळवलेल्या तरुणींचा सन्मान करण्यात आला.यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष बिराजदार गुरुजी, काशिनाथ बंडगर गुरुजी, नुतन मुख्याध्यापक विश्वनाथ बाणेगांव, नुतन पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कदम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तर महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या गावच्या संघर्षकन्या साक्षी सुरेश कल्याणशेट्टी व शिवानी सुरेश मनगुळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासक सरपंच वर्षा भंडारकवठे होत्या. तर व्यासपीठावर तंटामुक्त अध्यक्ष संजय बाणेगांव, पोलिस पाटील विवेकानंद हिरेमठ,पोलिस पाटील दयानंद बावकर,सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे,परमेश्वर वाले,गणेश कोळी,तंटामुक्त उपाध्यक्ष विशालराज नन्ना, सोसायटीचे व्हा.चेअरमन सुरेश सुरवसे,गंगाधर कांबळे गुरुजी,महादेव मोची, सुभाष बुगडे,प्रकाश बुगडे,विजयकुमार कोरे,श्रीशैल गाडवे,मोनप्पा दुलंगे,मडोळप्पा बाणेगांव,अंबण्णा हाल्लोळे,शरणप्पा हन्नुरे,दाऊद पटेल,लिपीक उमेश सोनार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी मनोगत व्यक्त करत ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंभुलिंग अकतनाळ यांनी तर आभार सिध्दाराम भंडारकवठे यांनी मानले.






















