सोलापूर – अखंड भारतातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानाचा श्री आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख व अमित काबणे यांच्या वतीने यांना अक्षय तृतीयाच्या व बसवेश्वर जयंतीनिमित्त निमित्ताने आजोबा गणपतीला आंब्याची आरास केली होती. हे आंबे आस्था सामाजिक संस्थेला पाच डझन आंबे देण्यात आले होते. तसेच आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 100 वंचित, बेघर निराधार यांना पुरणपोळी रस तुप, कटलेट, जिराराईस, वटांना भाजी या मिष्टांनाचे भोजन दिले.
या वाटपा प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, सुहास छंचुरे अमित काबणे,विनय काबणे,आलिशा काबणे, वैष्णवी काबणे, अथर्व काबणे,विराट काबणे,वरद काबणे, पिंटू कस्तुरे, सुरज छंचुरे, उपस्थित होते
भुकेलेला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोन्ही गोष्टीचा विचार करून आस्था सामाजिक संस्था दररोज दिवसातून किमान दोन वेळा तरी वैयक्तिक किचन द्वारे अन्नदान वाटप करण्याचे कार्य करत असते. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो त्याप्रमाणे ही आपणही आपल्या जवळील जो भुकेले ला व्यक्ती आहे त्या व्यक्तीला अन्नदान करण्यासाठी आमच्या आस्था सामाजिक संस्थेला संपर्क साधू शकता
आस्था सामाजिक संस्था गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे अन्नदान सेवा सुरू आहे. अन्ना पासून व्याकूळ असलेले अनेक वयोवृद्ध नागरिक बेघर व्यक्तीना आपण आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या घरातील स्मरणार्थ दिनी आमच्या संस्थेच्या मदतीने अन्नदान वाटप करू शकता. जर सोलापूरमध्ये कुठेही अन्न शिल्लक राहिले असेल तर आमच्या आस्था सामाजिक संस्थेस संपर्क करावे असे अध्यक्ष आनंद तालिकोटी व प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे यांनी केले.




















