केम – येथे बुधवारी २२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास अचानक काळे ढग आले सुरूवातीला भोगेवाडी येथे वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली या मध्ये गारपीट झाली त्यांनंतर जोरदार वारे सुटल्याने हा पाऊस पठाडाच्या शिवारात वादळीवाऱ्यासह जोरदार गारपीट झाली या मध्ये शेतकऱ्यांचे आंबा व उन्हाळी कांदा पिकाचे लाखो रू नुकसान झाले या मध्ये उत्तरेश्वर सावता राम तळेकर यांचे दिड एकर आंबा ची बाग आहे या बागेतील आंबे आता काढायला आली व्यापारी बघुन गेले होते.
गारपीट व वाऱ्यामुळे आंबे खाली पडून पसरंग झाली या मध्ये सुमारे सात लाख रू नुकसान झाले तसेच केमेश्वर सुरवसे यांची दिड एकर बाग अंदाजे सात लाख रुपये पांडुरंग जाधव यांची एक एकर आंबा च्या बागेचे सहा लाख रुपये नुकसान तसेच बिभीषण तळेकर यांचे आंबाचे नुकसान झाले तसेचे केमेश्वर सुरवसे यांची दिड एकर कांदा भुईसपाट झाला आहे अंदाजे सहा लाख रू नुकसान संजय जाधव यांची पण एक एकर कांदा अंदाजे दोन लाख संतोष तळेकर दिड एकर कांदा अंदाजे चार लाख र नुकसान ऊत्तरेश्वर बिचितकर कांदा दिड एकर अंदाजे पाच लाख भैरू बिचितकर एक एकर कांदा तीन लाख रू नुकसान झाले मोठ्या प्रमाणावर पठाडशिवारात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे


























