पंढरपूर – शहराला जास्तीत जास्त ७ ते ८ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.त्यामुळे उजनी धरणातून पंढरपूरच्या पाणी पुरवठ्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात यावे या मागणीचे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्ह्याधिकार्यांना दिले. यावेळी त्यांच्या समवेत तिथक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान नगराध्यक्षा भालके यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जाऊन पंढरपूर शहराला जास्तीत जास्त ७ ते ८ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. या मध्ये च सध्या भाविकांची संख्या देखील वाढत आहे. दरम्यान पाणी पुरवठा शहरातील स्थानिक लोकांना कमी पडत असून,शहरात येणाऱ्या भाविकांना पिण्याची पाणी सोय करणे गरजेचे आहे. त्या मध्येच भीमा नदीपात्र कोरडे पडले आहे. त्या मुळे उजनी धरणातून ताबडतोब भीमा नदी मध्ये पाणी सोडण्याची मागणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, सुधीर धोत्रे, किरण घाडगे, विद्यमान नगरसेवक प्रसाद कळसे, विनायक देवमारे, लोकेश यादव, ओंकार जोशी यावेळी उपस्थित होते.
























