Friday, April 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पालिकेत सत्तासंघर्ष पेटला; नगराध्यक्षांची कामगिरी ‘शून्य’, समीर मुलाणींचा घणाघाती आरोप

तरुण भारतbyतरुण भारत
April 23, 2026
in editor
0
पालिकेत सत्तासंघर्ष पेटला; नगराध्यक्षांची कामगिरी ‘शून्य’, समीर मुलाणींचा घणाघाती आरोप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डुवाडी –  नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर अवघ्या १०० दिवसांतच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. “थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी शहर विकासाचा एकही विषय पटलावर न घेता केवळ नागरिकांची दिशाभूल सुरू केली असून, त्यांची कामगिरी शून्य आहे,” असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी (अजित पवार गट) व रिपाईचे गटनेते समीर मुलाणी यांनी केला आहे.

​मंगळवारी उपनगराध्यक्षा सविता जगताप यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुलाणी बोलत होते. यावेळी आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते.

​६२ विषय दिले, पण एकही घेतला नाही

​समीर मुलाणी म्हणाले की, नगरपरिषदेत राष्ट्रवादी व रिपाई युतीचे १३ उमेदवार निवडून आले असून स्पष्ट बहुमत आमच्याकडे आहे. मात्र, नगराध्यक्षा आमच्या गटाच्या नसल्यामुळे त्या आकसापोटी कामे रोखत आहेत. गेल्या दोन सभांमध्ये आम्ही १० प्रभागांतील ६२ महत्त्वाचे विषय दिले होते, मात्र त्यांनी एकही विषय अजेंड्यावर घेतला नाही. केवळ श्वान नसबंदी आणि करमाफी यांसारखे विषय घेऊन शहर विकासाला फाटा दिला जात आहे.

​नगरसेवक पदरमोडून करत आहेत कामे

​शहरातील वार्षिक टेंडर्स अद्याप फोडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पथदिवे, पाण्याचे व्हॉल्व्ह, पाईपलाईन आणि घंटागाडी दुरुस्तीसाठी नगरसेवकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे,सोलापुर डिपीओ यांना  पत्र देऊनही नगराध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही मुलाणी यांनी यावेळी केला.

​पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे:

रानावनात रस्ते– शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून रानावनातील रस्ते जिथे घरेही नाहीत अशा ठिकाणी जसे की तिथे आयटी पार्क होणार असल्यासारखे ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

​अनुंकपा भरतीवर संशय: चार विषय प्रलंबित असताना केवळ एकाच विषयाचा समावेश केल्याने संशय व्यक्त करण्यात आला.

​आगामी २७ एप्रिलची सभा: 

येत्या सभेतही नगरसेवकांचे विषय डावलले गेल्याने सर्व नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

यावेळी पाणीपुरवठा सभापती अमर माने, शिक्षण सभापती संजय टोणपे, आरोग्य सभापती डॉ. मोहसीन मकनू, नगरसेवक जगन्नाथ क्षीरसागर, आनंद कदम, वसीम मुलाणी, निवृत्ती गोरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दत्ताजी काकडे, महेश गांधी, ॲड. हरिश्चंद्र कांबळे, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

Post Views: 11
Previous Post

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक; पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

Next Post

प्रज्ञाशोध परीक्षेत कडलास येथील स्वाती गायकवाड जिल्ह्यात प्रथम 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
प्रज्ञाशोध परीक्षेत कडलास येथील स्वाती गायकवाड जिल्ह्यात प्रथम 

प्रज्ञाशोध परीक्षेत कडलास येथील स्वाती गायकवाड जिल्ह्यात प्रथम 

ताज्या बातम्या

सांगोला-पंढरपूर-शेगाव रेल्वे सेवा सुरू करा 

सांगोला-पंढरपूर-शेगाव रेल्वे सेवा सुरू करा 

April 23, 2026
The Folk आख्यान’चा जल्लोष; ८५ पारंपरिक वाद्यांच्या निनादात रंगला सांस्कृतिक सोहळा

The Folk आख्यान’चा जल्लोष; ८५ पारंपरिक वाद्यांच्या निनादात रंगला सांस्कृतिक सोहळा

April 23, 2026
माण नदीत उन्हाळी आवर्तन; टेंभू-म्हैसाळ योजनेला गती

माण नदीत उन्हाळी आवर्तन; टेंभू-म्हैसाळ योजनेला गती

April 23, 2026
जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात; २५१ कर्मचाऱ्यांचा सहभाग

जनगणना प्रशिक्षणाला सुरुवात; २५१ कर्मचाऱ्यांचा सहभाग

April 23, 2026
पालखी तळाची सीईओ कुशल जैन यांनी केली पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी दक्ष राहावे

पालखी तळाची सीईओ कुशल जैन यांनी केली पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी दक्ष राहावे

April 23, 2026
रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

April 23, 2026
धावपटू अमोल आमुनेला ४६ हजार ५०५ रुपयांचे आर्थिक सहकार्य

धावपटू अमोल आमुनेला ४६ हजार ५०५ रुपयांचे आर्थिक सहकार्य

April 23, 2026
मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0826028

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697