सोलापूर. – थायलंड येथे दिनांक 17 ते 19 एप्रिल दरम्यान पार पडलेल्या वर्ल्ड मास्टर चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपीक ओमकार हरिदास गायकवाड यांनी 50 मीटर बॅकस्ट्रॉक या प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या .तसेच या कामगिरी बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या वेळी अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, पोलीस उप-अधीक्षक शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक सनगल्ले, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, कार्यालय अधीक्षक बाबासाहेब धर्मे तसेच कार्यालयातील सर्व लिपीक उपस्थित होते.

























