Tuesday, April 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे –  कवी अशोक नायगांवकर

तरुण भारतbyतरुण भारत
April 26, 2026
in editor
0
रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे –  कवी अशोक नायगांवकर
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – कवयित्री रेणुका महागांवकर यांनी लिहलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घडामोडीचा समावेश असल्याने यातील कविता हृदयात स्थिरावतात असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने अ‍ॅम्फी थिएटर मध्ये रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. 25 एप्रिल रोजी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द गायिका सन्मिता धापटे- शिंदे होत्या.


   शेकडो वर्षाची मराठी साहित्याची परंपरा मराठीचे वैभव आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यत पोहोचले पाहिजे. रेणुका महागांवकर यांच्यासारख्या गृहणींकडून कविता लिहल्या जातात आणि सातासमुद्रापार असलेल्या तरूण तरूणींकडून वाचल्या जातात यातच या हृदयस्थ काव्य संग्रहाचा सन्मान आहे. पुर्वीच्या काळात घरात शेतात काम करताना कविता तयार होत होत्या घराघरात बहीणाबाई होत्या परंतु आजच्या काळात क्रॉक्रीट आणि माती असा समाजात दुरावा निर्माण झालेला आहे. मराठी अभिजात करायची असेल तर प्रत्येकाच्या घरात पुस्तके असली पाहिजेत असेही कवी अशोक नायगांवकर यांनी सांगितले.  पुस्तकांचा भांडार असलेल्या या लोकमान्य टिळक सभागृहाला तीर्थक्षेत्रच म्हणले पाहिजे आणि अशा वास्तुत काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे आणि रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. याचे कौतुक आहे असेही नायगांवकर म्हणाले. प्रमुख पाहुण्या सन्मिता धापटे शिंदे यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, कविता लिहणे म्हणजे स्वतःला उलगडत जाणे. कवितामधून रेणुका महागांवकर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर आपल्या मनोगतामधून कवयित्री रेणुका महागांवकर यांनी काव्यसंग्रह लिहताना कसा अनुभव आला आणि साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्यांच्या जीवनातील घडामोडी कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले. शब्दात जादू पेरण्याची ताकद कवी मध्ये असते असेही महागांवकर यांनी सांगितले.


   प्रारंभी मान्यवर आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यांचा सत्कार झाल्यानंतर डिजिटल पध्दतीने रिमोटवरील बटण कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते दाबून कवयित्री रेणुका महागांवकर यांनी लिहलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर हृदयस्थ या काव्यसंग्रहातील कविता अमेरिकास्थित मधुरा गोडबोले,शलाका डोळस, कोल्हापूरच्या प्रियांका पाटील, अहिल्यानगरचे गणेश शिंदे आणि सोलापूरची समृध्दी देशपांडे यांनी कवितांचे वाचन केले. त्यानंतर या काव्यसंग्रहासाठी सहकार्य केलेल्या मुद्रीत शोधक केशव सातपुते, मुखपृष्ठ निशांत पोरे, सविता पाटील, गोविंद काळे, मधुकर पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, पृथा हलसगीकर, प्रकाश मोकाशे, अविनाश महागांवकर, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर आदींसह पंढरपूर माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, नगरसेवक सात्विक बडवे, उद्योगवर्धीनीच्या चंद्रीका चव्हाण, शुभम महागांवकर,श्रृती महागांवकर,निशा शहा, रसिका बडवे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माधव देशपांडे यांनी केले.


आमदार अभिजित पाटलांची त्या कवितेला भरभरून दाद
कवी अशोक नायगांवकर यांनी एक कविता सादर केली त्यामध्ये शेवटच्या वाक्यात मला भाजपामध्ये जावंसं वाटतंय अशी ओळ त्यांनी म्हणून कविता पूर्ण केली त्या कवितेला पंढरपूर माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी खळखळून हसून दाद देत जणू मनात असलेलं नायगांवकरांनी बोलून दाखवलं असा प्रतिसाद दिला. 

Post Views: 88
Previous Post

मंठा येथील कृषी सेवा केंद्र चालकांचा बेमुदत बंद आंदोलन

Next Post

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

ताज्या बातम्या

अंबरीषाच्या दरबारी बोलले मुख्यमंत्री

April 28, 2026
शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

April 28, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान नाही?

सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान नाही?

April 28, 2026
सोलापुरात ५ मे पासून रंगणार ‘विजय चषक’ क्रिकेट स्पर्धा

सोलापुरात ५ मे पासून रंगणार ‘विजय चषक’ क्रिकेट स्पर्धा

April 28, 2026
महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी विचारांची आजही आवश्यकता : प्रा. धन्यकुमार बिराजदार

महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी विचारांची आजही आवश्यकता : प्रा. धन्यकुमार बिराजदार

April 28, 2026
कृषी विक्रेत्यांचा विविध मागणयांसाठी बेमुदत संप; शेतकरी अडचणीत

कृषी विक्रेत्यांचा विविध मागणयांसाठी बेमुदत संप; शेतकरी अडचणीत

April 28, 2026
श्री कृष्णा रायरा मठातर्फे २ मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव

श्री कृष्णा रायरा मठातर्फे २ मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव

April 28, 2026
बालरंगभूमी परिषदेच्या उन्हाळी शिबिराचा सोलापुरात समारोप

बालरंगभूमी परिषदेच्या उन्हाळी शिबिराचा सोलापुरात समारोप

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0835034

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697