सोलापूर – ज्येष्ठ नागरिक संघाच्या (मेस्काॅन संलग्न) अध्यक्षपदी महापालिकेतील निवृत्त अभियंता विजय कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली त्यातही निवड करण्यात आली. ही निवड २०२६ ते २०२९ अशा तीन वर्षासाठी असेल. याच सभेत नूतन कार्यकारणीही निवडण्यात आली.
जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नूतन अध्यक्षांचा मावळते अध्यक्ष घनश्याम दायमा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या नूतन कार्यकारनीमध्ये उपाध्यक्षपदी श्रीवल्लभ करकमकर, कार्याध्यक्ष रमेश सोनी, सचिव नागनाथ पाटील, सहसचिव सतीश पाटील, कोषाध्यक्ष अशोक गरड, संघटक निशा गोडबोले, कार्यकारणी सदस्य विजयकुमार अथणीकर, पन्नालाल चंडक, अरविंद जगताप, डॉ. राजीव मोहोळकर, विश्वास मोहिते, पांडुरंग आदोने, घन:श्याम दायमा, ऍड. राजेंद्र दीक्षित, गुरुलिंग कन्नूरकर, सल्लागार पत्रकार दत्ता आराध्ये, पत्रकार दशरथ वडतिले, महादेव माने, कमलाताई शर्मा, विजयकुमार खंडेलवाल, बळवंत अहंकारी यांचा समावेश आहे.
यावेळी नागनाथ पाटील, रमेश सोनी, गुरुलिंग कन्नूरकर आणि महादेव माने आदी उपस्थित होते.

























