वळसंग : भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी साक्षी मल्लिनाथ भैरामडगी हि यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र झालेली आहे.
डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत प्रशालेतील २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी कुमारी साक्षी मल्लिनाथ भैरामडगी हिस केंद्रशासनाची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक वीरेश थळंगे आणि पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांनी पात्र विद्यार्थिनी कुमारी साक्षी भैरामडगी हिस पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन तिचे अभिनंदन केले.
या विद्यार्थिनीस स्पर्धा परीक्षेचे प्रमुख बाळकृष्ण गुंड, सिद्धाराम भैरामडगी, संजयकुमार धनशेटृटी, श्रीमंत भोसले,विजयकुमार प्याटी, मल्लिनाथ गौडगाव, बसवराज दुधगी, विजयालक्ष्मी थळंगे, गौरीशंकर चनशेट्टी इत्यादी शिक्षक शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी,स्कूल कमिटीचे चेअरमन शिवशरण थळंगे, संचालक विश्वनाथ थळंगे, रामेश्वर बिज्जरगी, प्रकाश दुधगी, शिवशरण प्याटी, रमेश दुधगी, मल्लिनाथ थळंगे, संजय दुधगी इत्यादींनी तिचे अभिनंदन केले.


























