पंढरपूर – येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये एमएचटी-सीईटी २०२६ ही परीक्षा सुरळीतपणे सुरु असल्याचे चित्र दिसून येतआहे. या परीक्षेचे व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी संगणकांवर आधारित विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली राबविण्यात येत आहे. यामुळे परीक्षार्थी व पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष् ट्रशासनातर्फे विविध अभ्यास क्रमांसाठी आवश्यक असलेली एमएचटी-सीईटी ही परीक्षा राज्यभरघेतली जात असून स्वेरीमध्ये दि. २५ मार्च २०२६ पासून ही परीक्षा सुरु झाली असून तीशासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या तारखांनुसार दि. १७ मे २०२६ पर्यंत चालणार आहे.यामध्ये तीन वर्ष व पाच वर्षांसाठी असलेले विधी अभ्यासक्रम (लॉ), इंजिनिअरिंग (पीसीएम), फार्मसी (पीसीबी), मास्टर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशन्स(एमसीए) व बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशंन्स (बीसीए) या अभ्यासक्रमांसाठी आवश्यकअसलेल्या एमएचटी-सीईटी येथे होत आहेत. कांही अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा पूर्ण झाल्या आहेत तर कांही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अद्याप सूरु आहेत.
या परीक्षे मध्ये बॉयलर प्लेट भाषा– पर्याय १ मधून महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटी २०२६ साठी तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांचा व्यापक संच अंमलात आणला असूनपरीक्षा प्रक्रियेची प्रामाणिकता, पारदर्शकताआणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आधार कार्ड, अपार कार्ड यांची पडताळणी, चेहरा ओळख (फेशियल रिकग्निशन) आणिबायोमेट्रिक प्रमाणीकरण यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांची मजबूत पडताळणी सुनिश्चित केली जात आहे.
या शिवाय ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे तो प्रत्येक केंद्रीकृतहॉलमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख आणि थेट निरीक्षण केले जात आहे तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर मानकीकृत प्रोटोकॉल लागू केल्यामुळे सुरक्षित आणिछेडछाड-रहित परीक्षा वातावरण तयार झाले आहे. या सर्व उपक्रमांमुळे न्यायतेसहजबाबदारी सुनिश्चित करणारी तंत्रज्ञान-सक्षम प्रणाली निर्माण झाली असल्याचे दिसतआहे. तसेच बॉयलरप्लेट भाषा– पर्याय २ मधून सीईटी–२०२६ ही तंत्रज्ञान-प्रथम परीक्षाप्रणालीकडे झालेली महत्त्वपूर्ण वाटचाल दर्शवते ज्यामध्ये विश्वासार्हता आणिपारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक उपायांचा वापर केला आहे.
बायोमेट्रिक्सआणि चेहरा ओळख यांद्वारे रिअल-टाईम ओळख पडताळणी, तसेच तंत्रज्ञान-आधारित देखरेख आणि कडक डिजिटल नियंत्रण यामुळे गैरप्रकारांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. थेट सीसीटीव्ही, केंद्रीकृत मॉनिटरिंग प्रणाली, तक्रार निवारण व आक्षेप नोंदणीसाठी सुलभ डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने सीईटी परीक्षेची प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि विद्यार्थी-केंद्रितझाली आहे. या तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोनामुळे सुरक्षितता, न्याय आणि भविष्याभिमुख परीक्षापद्धतीमुळे पालकांचा व परीक्षार्थ्यांचा या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिकभक्कम झाला आहे. सदरची परीक्षा शासनाच्या वतीने स्वेरीमध्ये सुरळीतपणे सुरु आहे.
विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ परीक्षेसंदर्भात असलेले नियम व अटी सहज पद्धतीने समजावून सांगितल्या जातात. त्यानंतर परीक्षार्थ्यांना संबंधित हॉलपर्यंत पोहोचवले जाते. त्यानंतर पालक वर्ग कॅम्पस मध्ये सर्वत्र असलेल्या झाडांच्या दाटसावलीत तसेच स्वेरीत असलेल्या वातानुकुलीत हॉलमध्ये आराम करतात हे चित्र दिसून येतआहे. स्वेरीने केलेल्या सोई- सुविधांमुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त केले जातआहे.

























