मोहोळ – स. वरवडे (ता.मोहोळ)येथील आनंद हनुमंत कुचेकर यांची भाजपा मोहोळ-दक्षिण तालुका अनुसूचित जाती मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तशा आशयाचे लेखी पत्र याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. विश्वजीत गायकवाड (नागपूर )यांनी दिले आहे.
श्री कुचेकर हे गेल्या २९वर्षा पासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी विद्यार्थी संघटनेचे ही काम केले आहे. पर्यावरण संतुलना साठी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वृक्षारोपण, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध दाखले उताऱ्या साठीच्या शिबिराचे आयोजन केले होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केंद्र प्रमुख म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

























