सोलापूर – निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.२७ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेचा १०० %, वाणिज्य शाखेचा ९०.३८% तर कला शाखेचा ८०.४३ % इतका निकाल लागला.विज्ञान शाखेतून विजयालक्ष्मी देगील (७१.३३%),आश्रित म्हेत्रे (६८.५० %), संजना माळी (६५.३३ %) गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.वाणिज्य शाखेतून आयेशा मकानदार (६७.७०%), संजना गडगी (६६.१७%), माया गडदे(६५%) गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.
कला शाखेतून अंकिता खोकले (७१.१७%), साईराम दासरी (६४.६७%), सुमा मठ(६३.८३%) गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. या विद्यार्थ्यांना प्रा. अमरनाथ दुस्सा,प्रा.दिपक नरोणे,प्रा.महेश नराल,प्रा.शांतेश करजगी, प्रा.चंद्रशेखर पाटील,प्रा.अनिल अंबारे,प्रा.अंगद तोरणे,प्रा.गीता चव्हाण, प्रा.राजश्री स्वामी, प्रा.प्रज्ञा भरमशेट्टी, प्रा.विद्या चिक्काळे आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्राचार्य रविशंकर कुंभार, माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे व सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.



























