अकलूज – सलग 17 व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शंकरराव मोहिते पाटील इंग्लीश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शंकरनगर अकलूज मधील विद्यार्थ्यांनी इ.12 वी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये भरघोस यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ.12 वी बोर्डाच्या 2026 परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक 02/05/2026 रोजी जाहीर झाला असून यामध्ये
1) कु. श्रेयाली अर्चना अभिजीत रणनवरे 88.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक
2) कु. मंजिरी वैजयंती अनुप इनामके 85.83% गुण मिळवत द्वितीय क्रमांक
3) कु. त्रिवेणी मनीषा उमेश माने 84.50% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.
कनिष्ठ महाविद्यालया मधील एकूण 86 विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली त्यामधील 52 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले व 34 विद्यार्थी प्रथम गुणवत्ता श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. महाविद्यालयात परीक्षेस बसलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.
शिवरत्न शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक, माननीय खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व अध्यक्ष, शितलदेवी मोहिते-पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवरत्न शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, प्रिन्सीपल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी 100% निकालाची परंपरा राखत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढी सोबतच सर्वांगीण कौशल्य विकास व्हावा यासाठी प्रोत्साहन दिले. सर्व यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे शिवरत्न संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य प्राचार्य, समन्वयक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


























