पंढरपूर – नगरपरिषद कामगार संघटना इंटकच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ प्रणिती भालके व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या समवेत कामगार संघटनेची बैठक आयोजित केली होती. या वेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी ॲड .सुनील वाळूजकर, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, संभाजी देवकर,धनजी वाघमारे, दिनेश साठे, जयंत पवार सतीश सोलंकी व इतर पदाधिकारी समवेत झालेल्या बैठकीमध्ये खालील मागण्या मान्य करण्यात आल्या.
————–
चौकट (मान्य झालेल्या मागण्या)
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची उपदानाची सर्व रक्कम रुपये १कोटी २० लाख येत्या दोन दिवसात देणार. जे सफाई कर्मचारी, शिपाई कर्मचारी सॅनिटरी इन्स्पेक्टर इंजिनियर ग्रॅज्युएट उच्च शिक्षण घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांना नगरपालिकेमध्ये त्यांच्या शिक्षणाानुसार लिपिक अतिक्रमण विभाग, बाग, बांधकाम, कर विभाग या ठिकाणी कामे देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या देय रकमा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महेबूब शेख हे सन २०१७ मध्ये मयत झाले होते या मयत कर्मचाऱ्यांला अद्याप पर्यंत कोणतीही रक्कम मिळालेली नाही त्यावरही चर्चा होऊन सदरची रक्कम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सफाई कर्मचारी शिपाई लिपिक यांना शासन निर्णयानुसार १२ व २४ वर्षाची तसेच १०/२०/३० ची आश्वासित प्रगती योजना लागू होण्याच्या दृष्टीने लवकरच कारवाई केली जाईल अशी आश्वासन यावेळी दिले. सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी वर्षातून आरोग्य शिबिरही घेण्याचे ठरले आहे तसेच तसेच कर्मचाऱ्यांचा किमान पाच लाखापर्यंत कोणताही आजार झाला तर त्याचा खर्च संबंधित विमा कंपनी उचलेल त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचा विमा उतरण्यात आला. त्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले व इतरही मागण्यावर चर्चा होऊन वेळोवेळी कामगार संघटनेची बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावण्याचा आश्वासन यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब यांनी दिले.
यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे यांनी मुख्याधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची हमी दिल्याने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे , जनरल सेक्रेटरी.अँड. सुनिल वाळूजकर कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष जयंत पवार, धनजी वाघमारे, संभाजी देवकर,संतोष सर्वगोड, सतीश सोलंकी ,दत्तात्रय चंदनशिवे. चेतन चव्हाण , समाधान काळे,अनिल अभंगराव.संजय वायदंडे महावीर भाऊ कांबळे, दिनेश साठे, प्रीतम येळे, संजय माने, वैभव दंदाडे हे उपस्थित होते.


























