सोलापूर – श्रमिक बांधकाम कामगार कल्याणकारी सेवाभावी संस्थातर्फे मित्र नगर शेळगी भागात 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त अर्जुन सलगर व शिवसेना (शिंदे गट) कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष सायबण्णा तेगेळ्ळी यांचा हस्ते बांधकाम कामगारांना कामगार कार्ड वाटप करण्यात आले.
अर्जुन सलगर यांनी मार्गदर्शन पर भाषणात कामगाराचे जे काही अडी – अडचणी असेल ते उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे मार्फत सोडविण्यांची गवाही दिली. त्यानंतर श्रमिक बांधकाम कामगार कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रफिक हणगी यांचे कार्याचे कौतुक केले व यांचा सत्कार सायबण्णा तेगेळ्ळी यांचा हस्ते करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष रियाज शेख यांच्या हस्ते सायबण्णा तेगेळ्ळी यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला, शरणू गुडियवरू यानी कामगाराचे उत्तीर्ण पाल्याचे पुढील वाटचाली करिता व बांधकाम कामगाराचे शासनाचे योजना याचे मार्गदर्शन पर भाषण केले.
यावेळी लता सामल, राधिका चिप्पा, यास्मीन बागवान, प्रियांका मलपेदी, शंकर सुंचु, वनिता सोमा, लता सामल, बोगा कामगार कार्ड वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मलीक भूसणूर, पोतन, आण्णासाहेब वाघचवरे, शोएब शेख, बाबू इंगवे, रुपनूर यांनी परिश्रम घेतले व आभार झीहान बागवान यांनी मानले.


























