कुर्डूवाडी : आदर्श ज्युनियर सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी यांनी यंदाच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल यश संपादन करत सलग पाचव्या वर्षी परिसरात अव्वल स्थान कायम राखले आहे. महाविद्यालयाचा निकाल 100% लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रौनक सय्यद या विद्यार्थिनीने 84.00 % गुण मिळवत कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. अनुपमा लोंढे या विद्यार्थिनीने 83.83% गुणांसह द्वितीय, तर शिवानी व्यवहारे व तेजश्री नलवडे या दोन विद्यार्थिनींनी 83.00% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.
एकूण 85 विद्यार्थ्यांपैकी 67 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर 18 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अमोल सुरवसे, प्रकल्प संचालिका मा. पूजा सुरवसे, प्राचार्या शकिलाबी सय्यद व सर्व शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .


























