श्रीपूर – येथिल चंद्रशेखर विद्यालयात १ ली ते १० शिक्षण घेवून डीएड नंतर याच शाळेत शिक्षक म्हणून काम करणेची संधी मिळालेले शंकर रामचंद्र यादव आज मुख्याध्यापक म्हणून विराजमान झाले आणि १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत पहिल्याच दिवशी भारताचा तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकावणेचा मान त्यांना मिळाला .
मुळचे श्रीपूरचेच असलेले शंकर यादव यांनी सुमारे ३५ वर्षा पूर्वी चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेस सुरुवात केली .
शाळेच्या प्रत्येक उपक्रमा मध्ये हिरीरीने भाग घेण्याच्या त्यांच्या कृती मुळे व अंगभूत स्काऊट गाईड चे आकर्षणामुळे त्यांना शाळा व्यवस्थापनाने त्याची जबाबदारी सोपवली ही जबाबदारी उत्तम पार पाडत त्यांना जिल्हा ट्रेनिंग कमिशनर या पदावर बढती मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचे प्रशिक्षण दिले . यात अनेक विद्यार्थी , विद्यार्थिनींची राष्ट्रीय पातळीवर नवी दिल्ली येथे सुवर्ण बाण स्पर्धेत निवड होऊन अनेक पुरस्कार प्राप्त झाले .
या बरोबरच शंकर यादव यांनी लहान मुलांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होण्यासाठी तसेच संस्कारक्षम पुस्तकांची निर्मितीही केली आहे . शाळेचे अध्यक्ष डॉ . रामदास देखमुख यांनी सुरेखा जाधव या सेवानिवृत्त झाल्या नंतर मुख्याध्यापक म्हणून शंकर यादव यांची नियुक्ती केली . चतुरस्त्र असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा हा सन्मानच आहे .























