सदाशिवनगर – अंगणवाडीच्या सेविका प्रमिला पोतदार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असल्याचे समजताच अंगणवाडीच्या चिमुकल्याचे डोळे पाणावले तर सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास चिमुकल्याच्या मातांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
प्रमिला पोतदार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ इंद्रनील कार्यालयात पार पडला यावेळी.अंगणवाडी अधिकाऱ्यासह पिसेवाडी मधील महिला व पुरुष पालकांनी उपस्थित राहून पोतदार यांच्या कामकाजाबाबत त्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये बहुसंख्य महिला पालकांनी आपले मनोगत व्यक्त करीत पोतदारबाईच्या कामकाजाची प्रशंसा केली.या कार्यक्रमास पिसेवाडी ग्रामस्थ,महिला पालक,अंगणवाडी सुपरवायझर ,कर्मचारी,शिक्षक उपस्थित होते.
तिस वर्षाच्या कार्यकाळात मी अंगणवाडीकडे नोकरीचे साधन म्हणून पहिले नाही तर सेवा म्हणूनच काम केले .नवीन पिढी घडत असताना त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम पालकांचे असते त्याच प्रमाणे या मुलाना घडविण्याची जबाबदारी आम्हा अंगणवाडी सेविकांची असून नवीन पिढीचा पाया मजबूत करण्याचे काम आम्ही करतो.ती सुसंकृत यासाठी आम्ही त्यांना स्वताच्या मुलाप्रमाणे सांभाळतो.एवढ्या वर्ष मला हि संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते.
– प्रमिला पोतदार (अंगणवाडी सेविका, पिसेवाडी, वेळापूर)
पोतदार बाईचे सर्वच काम अतिशय उल्लेखनीय असून आदर्श सेविका पुरस्कार प्राप्त पोतदारबाई सर्वासाठी आदर्श आहेत.मुलांना शिस्त लावणे ,सर्व अक्टीविटीज मनापासून घेणे,किशोरी मेळावा,गरोदर माता ,मातृवंदना ,लाडकी बहिण योजना,या सारख्या अनेक योजना लाभार्थ्यांना समजावून सांगून ,लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला






















