Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

तरुण भारतbyतरुण भारत
May 4, 2026
in editor
0
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दि. २४ ते २८ एप्रिलदरम्यान पार पडलेल्या साउथ एशियन गोल शॉट बॉल चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने चारही गटांमध्ये विजेतेपद पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली. या विजयी संघात सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, केगाव (सोलापूर) येथील तब्बल ८ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

स्पर्धेसाठी भारतीय संघ चेन्नई येथून विमानाने श्रीलंकेला रवाना झाला होता. स्पर्धेत सब-ज्युनियर बॉईज, सब-ज्युनियर गर्ल्स, यूथ बॉईज आणि यूथ गर्ल्स या सर्व गटांमध्ये भारताने अपराजित कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली. प्रत्येक गटात भारताने लीग फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत शानदार विजय नोंदवले.

सब-ज्युनियर बॉईज गटात भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेवर २३-१८ असा विजय मिळवला, तर सब-ज्युनियर गर्ल्स गटात १९-१६ अशी मात केली. यूथ बॉईज गटात ३६-२७ आणि यूथ गर्ल्स गटात २३-१९ अशा विजयांसह भारताने सर्वच गटांमध्ये सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

या स्पर्धेत सिंहगड संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रदर्शन केले. सब-ज्युनियर गर्ल्स गटात कु. जानवी बुराडे, यूथ गर्ल्स गटात कु. श्रद्धा चव्हाण व कु. आर्या पाटणे, सब-ज्युनियर बॉईज गटात आदित्य गुंड, आशिष बनसोडे व समर्थ मगर, तसेच यूथ बॉईज गटात अथर्व गुर्रम व वरुण सरडा यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत देशाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

या ऐतिहासिक विजयानंतर सोलापूर शहरात विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य विजयोत्सव रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान शहरातील विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर, सोलापूरचे चार हुतात्मे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सात रस्ता येथील महाराणा प्रताप, रेल्वे स्टेशन मार्गावरील महात्मा गांधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन करण्यात आले. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रबंधक डॉ. डी. आय नवले, प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. 

या प्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. “आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. क्रीडा क्षेत्रात सिंहगडचे विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

या यशामागे भारतीय संघाचे प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक राजू ठाकूर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या तांत्रिक प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि मानसिक तयारीमुळे संघाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.

या ऐतिहासिक विजयामुळे सिंहगड पब्लिक स्कूल तसेच सोलापूर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Post Views: 140
Previous Post

मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊनतर्फे दैनिक तरुण भारतच्या पत्रकारांचा गौरव

Next Post

सोलापुरात रसायनशास्त्र प्राध्यापकांसाठी आठवडाभराचा विशेष प्रशिक्षण उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापुरात रसायनशास्त्र प्राध्यापकांसाठी आठवडाभराचा विशेष प्रशिक्षण उपक्रम

सोलापुरात रसायनशास्त्र प्राध्यापकांसाठी आठवडाभराचा विशेष प्रशिक्षण उपक्रम

ताज्या बातम्या

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील आरोपीस बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील आरोपीस बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

August 9, 2026

चारा टाकताना गायीने ढुसणी मारल्याने गर्भवती महिला जखमी 

August 9, 2026
कोरफळे येथे उपसा सिंचन योजनेमधील टप्पा एकचे जलपूजन अडीच हजार एकर जमीन येणार ओलिताखाली

कोरफळे येथे उपसा सिंचन योजनेमधील टप्पा एकचे जलपूजन अडीच हजार एकर जमीन येणार ओलिताखाली

August 9, 2026
मराठ्यां समोर सत्तेचे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची वेळ येणार आहे : मनोज जरांगे पाटील

मराठ्यां समोर सत्तेचे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची वेळ येणार आहे : मनोज जरांगे पाटील

August 9, 2026
भाजप मधील निष्ठावंतांना सत्तेचा आस्वाद घेता येत नाही – सुषमा अंधारे 

भाजप मधील निष्ठावंतांना सत्तेचा आस्वाद घेता येत नाही – सुषमा अंधारे 

August 9, 2026

सोलापुरात सुषमा अंधारेची पत्रकार परिषद

August 9, 2026

अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना मुख्यमंत्र्यांना विचारणार धनगर आरक्षणाचा प्रश्न

August 9, 2026

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली

August 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1042377

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!