Wednesday, September 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

न्यायालयातील राष्ट्रीय महालोक अदालतीत २४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली

तरुण भारतbyतरुण भारत
May 11, 2026
in editor
0
न्यायालयातील राष्ट्रीय महालोक अदालतीत २४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री. एम. एस. शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर  श्री. एस. एस. शिंदे यांचे सहकार्याने, बार्शी तालुका विधी सेवा समिती, बार्शी व वकील संघ बार्शी यांच्या संयुक्त विदयमानाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीत ७८ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पूर्व २३७९ असे एकुण २४५७ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने मिटवुन त्यात सुमारे प्रलंबित प्रकरणात अनुक्रमे १ कोटी ५१ लाख ६६ हजार १९१ रुपये व दाखलपूर्व प्रकरणांत ७५ लाख ६६ हजार ७४ रुपयांची वसुली झाली. या राष्ट्रीय महालोकअदालतीत बार्शी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी असे ३७२१ व दाखलपूर्व ६५०४ असे एकुण १०२२५ प्रकरणे लोकअदालत पॅनलमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये बार्शी न्यायालयातील एकुण चार पॅनल करण्यात आले होते. त्यात जिल्हा न्यायाधीश १ श्री. विक्रमादित्य के. मांडे, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती पी. व्ही. राऊत, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती एच. यु. यु. पाटील, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती आर.पी. बागडे असे एकुण चार पॅनल होते. तसेच २रे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती जी. एस. पाटील यांचे गुन्हा कबुलीचे विशेष न्यायालय चालु ठेवण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे पॅनल क. ४. श्रीमती आर. पी. बागडे, सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर यांचे पॅनलसमोर वयोवृध्द पक्षकार सखुबाई शंकर गवळी यांचे तडजोडीकामी न्यायाधीश स्वता दालनाबाहेर गेले व तडजोडीबाबत पूर्तता केली. जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांत एकुण १ प्रकरण तडजोडीने मिटुन त्यात सुमारे १२ लाख हजार इतक्या रक्कमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एन. आय. ॲक्ट १३८ च्या एकुण १३ प्रलंबित प्रकरणांत तडजोड होवुन त्यात सुमारे २० लाख १७ हजार ६०० रुपयांची वसुली तर रक्कम वसुलीच्या १ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात १० लाख १९ हजार ८८१ रुपयांची वसुली झाली. न्यायालयातील प्रलंबित कबुलीची ५७ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. त्यात सुमारे ४१ हजार २०० रुपयांची दंड वसुल करण्यात आला. सदर लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग नोंदविला. राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये यशस्वी करणेकामी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, सर्व न्यायालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका तसेच फायनान्स कंपन्या, पंचायत समिती बार्शी, वीज वितरण कंपनी यांचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले.

           फोटो ओळी

दिवाणी प्रकरणातील तडजोडनामा देताना न्यायाधीश व्ही के मांडे, पी.व्ही. राऊत, एच.यु.यु. पाटील, जी.एस. पाटील, आर.पी. बागडे व  पक्षकार व विधीज्ञ. 

Post Views: 53
Previous Post

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने पंचागकर्ते मोहन दाते यांचा सन्मान

Next Post

उर्वरित गावांचा निरा देवधर प्रकल्पात समावेश करुन ताबडतोब टेंडर काढणयासाठी मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उर्वरित गावांचा निरा देवधर प्रकल्पात समावेश करुन ताबडतोब टेंडर काढणयासाठी मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन

उर्वरित गावांचा निरा देवधर प्रकल्पात समावेश करुन ताबडतोब टेंडर काढणयासाठी मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन

ताज्या बातम्या

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

September 15, 2026
जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

September 15, 2026
कट्टेप्पा कोळी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान 

कट्टेप्पा कोळी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान 

September 15, 2026
ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

September 15, 2026

पाेलीस आसल्याची बतावणी करून  मंगळवेढ्यात भरदिवसा दाेघांना लुटून  २ लाख .१६ हजाराचे साेने केले गायब

September 15, 2026
युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

September 15, 2026

२९ सप्टेंबरला शिवस्मारक सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा

September 15, 2026

सोलापुरात २७ सप्टेंबरला वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर मेळावा

September 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1214406

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!