पंढरपूर – येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचा कारभार हा मनमानी पद्धतीने चाललेला आहे. याचेअजून एक उदाहरण नुकतेच समोर आलेले आहे. श्रीविठ्ठलमंदिरातील सभामंडपा लगत असलेल्या एका बाजूला तत्कालीन व्यवस्थापकांसाठी पन्नास लाख रूपये खर्चून बनवलेलं सागवानी फर्निचरयुक्त कार्यालय (केबीन ) मंदिरे समितीकडून उध्दवस्त केलं गेले आहे.
या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी देखील मंदिर समितीला जाब विचारला आहे. याबाबतचे नेमके स्पष्टीकरण मंदिर समितीने द्यावे नाही तर याचा जाब दस्तुरखुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाच विचारु असा इशारा देखील यावेळी अकुंशराव यांनी दिला आहे.
मंदिर समितीने एका भाविकाकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या निधीतून नुकतेच या कार्यालयातील फर्निचरसह कार्यालयाच्या नुतनीकरणाचासाठीचा सर्व खर्च केलाहोता. परंतु कोणतेही कारण अथवा सबब जाहीर न करता कोणतीही प्रशासकीय परवानगी अथवा ठराव न करता हे कार्यालय (केबीन)फर्निचरसह उध्दवस्त करण्यात आले आहे. हे केबीन उभारण्यासाठी ज्या भाविकाच्या देणगीचा पैसा वापरला गेला त्या देणगीदार भाविकाचे नाव मंदिरे समितीप्रशासनाने जाहीर करावं, हे काम करताना व पुन्हा ते काढून टाकताना मंदिरे समितीनेकोणते ठराव केले आहेत का? ते ही जाहीर करावं, अशा पध्दतीने मंदिरे समितीला भाविकांकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या लाखो रूपयांची उधळपट्टी करण्याचे अधिकार मंदिरे समितीच्या कारभा-यांना कुणी दिले? असा प्रश्न देखील या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अकुंशराव यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान हा मनमानी कारभार व भाविकांच्या भावनांशी चालवलेला हा खेळआजिबात खपवून घेतला जाणार नाही, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, ही मंदिर समितीच बरखास्त करावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते अकुंशराव यांनी केली आहे.
—————–
फनिर्चर संदर्भात जर आम्हाला सखोल माहिती मिळाली नाही तर आगामी काळात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते पंढरीत होणार असलेल्या दर्शन मंडप भुमिपुजन कार्यक्रमा दरम्यान आम्ही तीव्र आंदोलन करू, हा कार्यक्रम रोखू. यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यासाठी सर्वस्वी मंदिर समिती प्रशासन जबाबदार राहील.
गणेश अंकुशराव ( सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर)

























