सोलापूर – येथील विजापूर रोड, सैफुल जवळील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे वार्षिक तांत्रिक महोत्सव “ए. जी. टेकफेस्ट २k२६” अत्यंत उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. या महोत्सवामध्ये विविध अभियांत्रिकी शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य, कल्पकता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
टेकफेस्ट अंतर्गत विविध विभागांमार्फत अनेक नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने:
*संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) विभाग: पेपर प्रेझेंटेशन आणि व्हॅलोरंट (Valorant) गेमिंग स्पर्धा.*
*मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग: कॅड वॉर (CAD War) आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा.*
*सिव्हिल अभियांत्रिकी विभाग: टॉवर बिल्डर्स आणि हाऊसी तंबोला कार्निव्हल.*
*इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभाग: रोबो रेस आणि बीजीएमआय (BGMI) गेमिंग अरेना.*
या महोत्सवात सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच नेतृत्वगुण, सांघिक भावना (Teamwork) आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची सुवर्णसंधी मिळाली. सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. ए. पाटील,सचिव श्री. एस. एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले व प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले.
महोत्सवाचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा. कल्याणी मामड्याल यांनी काम पाहिले. तसेच प्रा. ए. आर. मळेकर, प्रा. पी. बी. साबळे, प्रा. आर. एस. होर्टीकर व प्रा. व्ही. एम. भोगडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. कार्यक्रमाची सुसूत्रता राखणे,
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रा. एन. पी. पाटील, प्रा. एस.एन. उपाध्ये, प्रा. एस.जे.लिगाडे व ए.एम.चिल्ला यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.
या तांत्रिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना उत्तम चालना मिळाली असून, त्यांच्यामधील तांत्रिक शिक्षणाची आवड अधिक वृद्धिंगत झाली आहे, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.
*फोटो ओळी:- याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांच्या समवेत, समन्वयक प्रा. कल्याणी मामड्याल, डिपार्टमेंट प्रमुख व प्राध्यापक वर्ग*
























