करकंब : विद्या विकास मंदिर उंबरे (पागे) या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.४३ टक्के लागला.यामध्ये वैष्णवी कानगुडे ९६.४०,वैष्णवी वावरे ९०.६०,शिवम तळेकर ८९.६० या विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
विशेष प्राविण्यासह (७५ टक्केच्यावर) १५ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, वर्गशिक्षिका यांचेही अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी,पालक उपस्थित होते.

























