सोलापूर – शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रोत्सवास गुरुवार दि. १४ पासून सुरुवात होणार असून त्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून श्री चौडेश्वरी मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या भव्य सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा मैंदर्गी येथील विरक्त मठाचे श्री म.नि.प्र मृत्युंजय महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते होणार आहे.
तसेच सामाजिक बांधिलकी आणि विकास कामांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना “श्री चौडेश्वरी सेवा रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती श्री चौडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली आहे.

























