पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, अनेक ठिकाणी मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात डीजेचा वापर केला जात आहे. या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक, वृद्ध आणि ह्रदय रुग्ण कमालीचे हैराण झाले आहेत. तसेच प्रखर लेसर लाईट मुळे नागरिक हैराण झाले असून सर्वत्र डीजे डॉल्बी बद्दल जनतेतून संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, सुप्रीम कोर्टाची डीजे डॉल्बी प्रखर लाईट यावर बंदी आदेश असूनही सर्वत्र सर्रासपणे महापुरुषांच्या जयंती उत्सवावेळी प्रशासनाकडून नियमांचे कडक पालन करावे.म्हणून डीजेला परवानगी नाकारली जाते, मग लग्न सोहळ्यांसाठी हे नियम शिथिल कसे? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर,पिलीव परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर डीजे डॉल्बी व लेसन लाईट चालकावर संयोजकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पिलीव पत्रकार संघाच्या वतीने पिलीव पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार सतिश रोकडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.याप्रसंगी पिलीव पत्रकार हसंघांचे अध्यक्ष गणेश देशमुख, सचिव शाहरुख मुलाणी,कार्याध्यक्ष प्रा संजय पाटील, दामोदर लोखंडे, अतुल नष्टे, सुजित सातपुते,प्रमोद भैस,उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुरुषांच्या जयंती उत्सवावेळी सोलापूर जिल्ह्यात पोलिसांनी शांतता राखण्यासाठी डीजे यवापराबाबत कडक भूमिका घेतली होती. अनेक मंडळांना परवानगी नाकारण्यात आली, तर काहींवर अटी लादल्या गेल्या. मात्र, धंभभसध्या लग्नाच्या मिरवणुकां वराती गावदेव या मध्ये रात्री उशिरापर्यंत, तसेच दिवसा अत्यंत उच्च क्षमतेने डीजे वाजवले जात आहेत. यामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडली जात असून, प्रशासनाचा याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप होत आहे.
डीजेच्या दणदणाटामुळे लहान मुले, हृदयाचे रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हे वाद्य सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. “नियमावली सर्वांसाठी समान असावी, मग ती जयंती असो वा लग्न सोहळा,” अशी भावना पिलीव परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील आणि परिसरातील शांतता भंग करणाऱ्या अशा डीजेह औँचालकांवर आणि संबंधित आयोजकांवर पोलीस प्रशासनाने कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पिलीव पत्रकार संघाने निवेदनाद्वारे. केली आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर या त्रासाविरुद्ध नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे.
पिलीव च्या पेठेमध्ये सतत गर्दी असते,त्यामुळे डीजे वाजत असताना ग्राहक थांबत नाहीत यामुळे आर्थिक तोटा होत असल्याची प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी दिली.कारण व्यापाऱ्यांच्या दुकानाचे काचा फुटून आतील माल, सामान साहित्य पडून नुकसान झाल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे
डीजे डॉल्बी चालकावर कारवाई करावी व नियमाचे पालन करावे म्हणून पिलीव पत्रकार संघाच्या वतीने पिलीव पोलिसांना निवेदन देताना गणेश देशमुख,शाहरुख मुलाणी संजय पाटील दामोदर लोखंडे अतुल नष्टे
सुजित सातपुते प्रमोद भैस तसेच निवेदन स्वीकारताना हवलदार सतीश रोकडे व नितीन लोखंडे



























