Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
May 14, 2026
in editor
0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापुर – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उद्या, १४ मे २०२६ (गुरुवार) रोजी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे निरीक्षण आणि भूमिपूजन करणार आहेत.

मंत्री गडकरी हे सकाळी ८:३० वाजता पुण्यातील हॉटेल जे.डब्ल्यू. मॅरियट येथून हडपसरकडे रवाना होतील. त्यानंतर दिवे घाट मार्गे जेजुरी आणि पुढे फलटणला भेट देतील. सकाळी ११:०० वाजता ते ‘नीरा कॅनल ब्रिज’ची पाहणी करून दुपारी १२:०० वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील.

  फलटणहून नातेपुते आणि वेळापूर मार्गे ते दुपारी २:०० वाजता पंढरपूरला पोहोचतील. दरम्यान खुडूस ता माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पुरातन बारव (विहीर) याठिकाणी ते पाहणी करणार आहेत तसेच बाजीराव विहीर पंढरपूर येथेही पाहणी करून पुढे ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी दुपारचे भोजन व विश्रांती होईल.

 दुपारी ४:४० वाजता ते हेलिकॉप्टरने पंढरपूरहून अक्कलकोटसाठी रवाना होतील. अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आणि शिवपुरीला भेट दिल्यानंतर, संध्याकाळी ६:३० वाजता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहतील.

 मंत्री गडकरी यांना ‘Z+’ श्रेणीची सुरक्षा असून या दौऱ्यात CRPF चे पथक त्यांच्या सोबत असेल. या दौऱ्यात पुण्यापासून फलटणपर्यंत साधारण ७० माध्यम प्रतिनिधी दोन बसमधून सोबत असणार आहेत. मंत्री गडकरी यांचा रात्रीचा मुक्काम सोलापूर येथील हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर येथे असेल. 

• घुलेनगर, खुडूस, ता माळशिरस येथील ऐतिहासिक विहिरीची माहिती 

खुडूस (जि. सोलापूर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील ही ऐतिहासिक विहीर असून ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या अनेक लोकोपयोगी कामांपैकी एक मानली जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत पांथस्थांची आणि ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणी बारवा आणि विहिरींचे जाळे विणले होते, त्यातीलच ही एक महत्त्वाची वास्तू आहे. या विहिरीचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण अशा दगडी चिऱ्यांमध्ये केलेले असून आजही ते अत्यंत भक्कम स्थितीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा होळकरकालीन इतिहासाचा साक्षीदार आहे. खुडूस आणि आसपासच्या परिसरातील ही विहीर स्थानिक लोकांसाठी श्रद्धेचे आणि अभिमानाचे स्थान आहे. अनेक दशकांनंतरही ही विहीर अस्तित्वात असून, ती परिसरातील ऐतिहासिक जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना मानली जाते.

Post Views: 115
Previous Post

राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

Next Post

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

ताज्या बातम्या

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026
पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीतर्फे १५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीतर्फे १५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 5, 2026

सरकारी शाळेतच खाजगी शाळेचे ‘बस्तान ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0959778

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!