वळसंग – बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख धनेश आचलारे यांच्या वाढदिवसानिमित्त ६५ जणांनी रक्तदान केले.
धनेश आचलारे मित्र परिवार सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असते.दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक उपक्रम राबवित असते.तसेच
दरवर्षी आचलारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो यावर्षी सुद्धा वृक्षारोपण, रूग्णांना फळे वाटप,रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर
या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन ब्लड सेंटरचे प्रमुख अमजद पठाण , सत्यम गायकवाड, जनसंपर्क अधिकारी नंदिनी मस्के, विशाल कोलूर, टेक्निशियन मिसबा कोटी, लता श्रीमल, अभिषेक राऊत व ग्रामस्थ मित्र परिवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्कारमूर्ती धनेश आचलारे म्हणाले,वाढते अपघात अन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच रखरखत्या उन्हामुळे विविध रुग्णालयात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे ही समस्या दूर करण्यासाठी सर्वत्र रक्तदानाची शिबिर आयोजित करून ही चळवळ अधिक व्यापक करणे गरजेचे आहे. प्रत्येक युवकांनी रक्तदान करून आपले सामाजिक बांधिलकी जपावेत असे आवाहन त्यांनी केले.

























