अक्कलकोट – गाव समृद्ध करा समतोल विकास करा . देशाला विश्व गुरु बनवायचे आहे . शेतकरी अन्नदाता आहे तो उर्जा दाता झाला पाहिजे . शेतकऱ्यांनी हवाई इंधन बनवावे शेतकरी हायड्रोजन इंधन तयार करेल एनर्जी निर्यात करणारा देश बनवायचा आहे एनर्जी आयात करणारा नको रोजगार निर्मीती करा . दळणवळण सुलभ झाले तर पर्यटन वाढेल सोलापुर जिल्हा देशाच्या मध्यभागी असुन देशाच्या सर्व भागात येथून कनेक्टीविटी मोठी आहे पर्यटन
वाढीमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी होतात . गरीबाना रोजगार दया गरीबी दुर होईल गावे स्मार्ट करा शेतकऱ्याना वीज पाणी मिळाले पाहिजे शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल . रोटी कपडा और मकान आणि सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे तर सर्वाच्या सहकार्याने सुखांक वाढेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालय मंत्री नितीन गडकरी यांनी केले .
वागदरी अक्कलकोट तोळणुर रा म . क्र . ५४८ बी चे पेव्हड् शोल्डर सहित दुपदरीकरण करणे (3५३ कोटी ) ‘ मोहोळ – बसवनगर.. – वळसंग ( ७५६ कोटी ) , दुधनी येथे रेल्वे उड्डाण पुल बांधणे व रा म क्र १५० चे उन्नतीकरण करणे ‘ (9 7 कोटी ) ‘ बोरी उमरगे येथे बोरी नदीवर पुल बांधणे (२६ कोटी ) आदि विविध विकास कामाचे प्रकल्पाचे भुमिपुजन केंद्रीय मंत्री रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . याप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते .
व्यासपीठावर आ सचिन कल्याणशेट्टी ‘ ,आ सुभाष देशमुख’ आ विजय देशमुख ‘ आ समाधान अवताडे ‘ आ देवेंद्र कोठे , कर्नाटकचे आ . बी आर पाटील खासदार प्रणित शिंदे खा ज्योती वाघमारे माजी आ राजन पाटील , माजी आ प्रशांत परिचारक , माजी आ. राम सातपुते ,मा आ राजेंद्र राऊत , मा . आ . यशवंत माने , मा आ . दिलीप माने , सोलापुर जिप अध्यक्ष दिपक वैद्य ‘ महापौर विनायक कोंड्याल ‘ , सभापती रश्मी हिप्परगी , दक्षिण सभापती संदिप टेळे . नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , मैंदर्गी नगराध्यक्षा अंजली बाजारमठ , सोलापुर जिप उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिप पक्षनेत्या रश्मी बागल , जिप सभापती रामप्पा चिवडशेट्टी , सोलापुर ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष शशीकांत चव्हाण . . भाजपा सोलापुर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर , उपसभापती सागर कल्याणशेट्टी , सोलापुर दक्षिण उपसभापती वर्षा पटणे , उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड , मैंदर्गी उपनगराध्यक्ष सुरेश नागुर , दुधनी कृ उ . बा . सभापती सातलिंग परमशेट्टी , अक्कलकोट कृ उ बा उपसभापती आप्पासाहेब पाटील , मा जिप सदस्य रणजीत शिंदे , पक्षनेता नपा अक्कलकोट यशवंत धोंगडे , मैंदर्गी नपा पक्षनेत्या सुरेखा होळीकट्टी , भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार , मध्य मंडल अध्यक्ष प्रदिप पाटील , दक्षिण मंडल अध्यक्ष सुनिल खेड , दक्षिण मंडल अध्यक्ष महादेव पाटील , उत्तर मंडल अध्यक्ष अमोल हिप्परगी अन्नछत्र मंडळाचे मुुख्य काार्य अध्यक्ष अमोलराजे भोसले ‘ वटवृक्ष देवस्थान चे अध्यक्ष महेेश इंगळे आदि मान्यवरांची
प्रमुख उपस्थिती होती .
प्रारंभी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट तीर्थक्षेत्र वाढी साठी सुलभ दळण वळण कामी रस्ते विकासाची मोठी विकास कामे व मुबलक निधी गडकरी साहेबानी दिल्यामुळे अक्कलकोट मध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढल्याचे सांगितले आज वीस पंचवीस मिनीटात सोलापुरला जाऊ शकतो सुलभ दळण वळणामुळे पर्यटन वाढले हॉटेल भक्त निवास लॉज रिसोर्ट वाढले रोजगार वाढला उद्योग धंदे वाढले अनेकाना हाताला काम मिळाले याचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानाच आहे त्यांचे अक्कलकोट करांवर फार मोठे उपकार आहेत असे गौरवोद्गार काढून गाणगापुर रस्त्याची पुन बांधणी सोलापुर साठी रिंग रोड रस्ता आदि रस्ते विकास कामाची मागणी केली . खा प्रणिती शिंदे यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विकास कामात राजकारण न आणणारे नेते असे गौरवोद्गार काढून गडकरी यांच्या कामाची मोठी स्तुती केली .
याप्रसंगी नगरसेवक महेश हिंडोळे , सभापती देवीदास कवटगी सभापती अविनाश मडीखांबे , नगरसेवक तम्मा शेळके , चंद्रकांत दसले शिवशरण जोजन , मोतीराम राठोड ‘ राजेंद्र बंदिछोडे , अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नन्हु कोरबु , धनंजय गाढवे प्रकाश पाटील , नगरसेवक रमेश कापसे , नगरसेविका स्वप्नाली शिंदे , अप्पासाहेब बिराजदार मााजी ता . अध्यक्ष मल्तीनथ स्वामी प्रा साठे
अरवत भाजप चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


























