Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिरसीचा पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी

तरुण भारतbyतरुण भारत
May 19, 2026
in sports
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचा सुपुत्र आणि नामवंत पैलवान महेंद्र गायकवाड याने कुस्ती क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.  साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मूळच्या मंगळवेढयाच्या महेंद्र गायकवाडने मानाची हिंदकेसरी गदा पटकावली आहे. तीनवेळा उपमहाराष्ट्र केसरी राहिलेला महेंद्र गायकवाड अखेर देशाचा 39वा आणि महाराष्ट्राचा 10वा हिंदकेसरी ठरला आहे.
भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत देशभरातील 28 राज्यांतील सुमारे 850 महिला व पुरुष मल्ल सहभागी झाले होते. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात ही लढत झाली. कुस्ती सुरू झाल्यानंतर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने डाव टाकला तेव्हा पृथ्वीराजच्या हाताला इजा झाली. त्याला हात हलवताही येत नसल्याने त्याने माघार घेतली. त्यानंतर बाहुबली म्हणून नावलौकिक असलेला महेंद्र हिंद केसरीचा मानकरी ठरला.
यंदा अंतिम फेरीत दोन्ही पैलवान महाराष्ट्राचेच आमनेसामने असल्याने ही मानाची गदा राज्यातच येणार हे आधीच निश्चित झाले होते. मात्र लढती दरम्यान झालेल्या प्रकारामुळे कुस्तीशौकिनांना हवी तशी लढत पाहायला न मिळाल्याने त्यांची काहीशी निराशा झाली. अखेर विजयी घोषित होताच महेंद्रला आपले अश्रू अनावर झाले आणि या ऐतिहासिक विजेतेपदासह त्याने मानाची हिंदकेसरी गदा व एक थार गाडी आपल्या नावावर केली.
अंतिम लढतीत महेंद्रने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पृथ्वीराजवर चढाई केली आणि सुरुवातीलाच दोन गुणांची कमाई केली. पृथ्वीराज खाली असताना महेंद्रने त्याचा उजवा हात पकडून डाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण याच दरम्यान पृथ्वीराजचा हात उलटा फिरल्याने सामन्यात आक्षेप घेतला गेला आणि कुस्ती थांबवण्यात आली. विशेष म्हणजे, इतकी मोठी दुखापत झाली असतानाही पृथ्वीराज जिद्दीने पुन्हा लढण्यासाठी तयार झाला होता, मात्र त्याचा हात अजिबातच हलत नसल्याने वैद्यकीय कारणास्तव कुस्ती थांबवून अखेर महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले.
तीन पिढ्यांची कुस्ती परंपरा
महेंद्र गायकवाडच्या घराला तीन पिढ्यांची कुस्ती परंपरा आहे. मंगळवेढा तालुक्यातील शिरसी हे त्यांचे गाव. शेती हा त्यांच्या कुटुंबांचा मुख्य आधार. घराला वारीची आणि लाल मातीची परंपरा. आजोबा शंकर, वडील बाबासाहेब, चुलते काकासाहेब आणि महेंद्र अशी लालमातीत झुंजणाऱ्या पिढीची नावे. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीत राबवणाऱ्या गायकवाड यांच्या शिरसी गावात 1966 मध्ये तालमीची स्थापना झाली. याच तालमीत महेंद्रने कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. येथेच चुलते काकासाहेब आणि वडील बाबासाहेब कुस्ती खेळत. आईवडील, चुलते, भाऊ आणि इतरांच्या देखरेखीखाली महेंद्रची कुस्ती क्षेत्रातील वाटचाल सुरू राहिली आहे. दहावीपर्यंत तो याच तालमीत होता.

Post Views: 48
Previous Post

डिजिटल घरगणनेलाप्रारंभ; अचुक माहितीदेऊन सहकार्य करावे  : तहसिलदार सचिन लंगुटे यांचे आवाहन  

Next Post

पंढरपूरात पाचव्या अक्षर संमेलन आयोजन.कलाकारांची मांदियाळी, संमेलना निमित्त पंढरीत २२, २३ व २४ मे रोजी जमणार कलावारकरी.

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पंढरपूरात पाचव्या अक्षर संमेलन आयोजन.कलाकारांची मांदियाळी, संमेलना निमित्त पंढरीत २२, २३ व २४ मे रोजी जमणार कलावारकरी.

ताज्या बातम्या

शिक्षक दिनीच शिक्षक रस्त्यावर; जुनी पेन्शनसाठी सरकारला इशारा

शिक्षक दिनीच शिक्षक रस्त्यावर; जुनी पेन्शनसाठी सरकारला इशारा

September 5, 2026
 शंकरलिंग प्रशालेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिन म्हणून संपन्न

 शंकरलिंग प्रशालेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिन म्हणून संपन्न

September 5, 2026
श्रीकृष्णासारखे दैवी गुण आत्मसात करा; राजयोगाने जीवनाचा आंतरिक शृंगार करा

श्रीकृष्णासारखे दैवी गुण आत्मसात करा; राजयोगाने जीवनाचा आंतरिक शृंगार करा

September 5, 2026

चोरी करून खून करणाऱ्या तरुणाला कलबुर्गीतून केले जेरबंद ग्रामीण पोलिसांची कामगिरी #viral#breakingnews

September 5, 2026

सोलापुरात निघाला मुक मोर्चा

September 5, 2026

बदलापुरात नगरसेवकावरच हल्ला #viral #news

September 5, 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी काढला थेट या गोष्टीचा आदेश #solapurnews #viral

September 5, 2026

अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी पार्क चौकातील अतिक्रमण करणाऱ्या गाड्यांना इशारा #viral #solapurnews

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165559

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!