सांगोला – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इ.११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गतिमान झाली असून त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजमध्ये इ.११ वी प्रवेशाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाची प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन असून इन-हाउस आणि मॅनेजमेंट कोट्यासाठीची शून्य फेरी काल दि.२० मे रोजी संपली आहे. त्यानंतर सर्वसाधारण प्रवेशांसाठीची पहिली नियमित फेरी आजपासून म्हणजेच दि.२१ मे पासून सुरू होत असून ती दि.३० मे पर्यंत चालेल. या पहिल्या फेरीच्या नियोजनानुसार आज दि.२१ आणि उद्या दि.२२ मे रोजी विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करता येईल. तसेच अर्जाचा भाग १ आणि भाग २ मध्ये बदल करून पसंतीक्रम भरता येईल. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरताना गुणवत्तेची प्रदीर्घ परंपरा असलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजचे नाव एक नंबरला नोंदवावे, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. यानंतर दि.२३ ते २५ मे दरम्यान अर्जांची पडताळणी होईल आणि दि.२६ मे रोजी सकाळी पहिली गुणवत्ता यादी व कट-ऑफ जाहीर केला जाईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांनी दि.२६ मेच्या सायंकाळपासून दि.२८ मे पर्यंत ऑनलाइन प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करून महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. दि.२९ मे रोजी रिक्त जागांची माहिती दिली जाईल आणि दि.३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होईल.
चौकट-
११ वी प्रवेशासाठी अर्जाचा भाग १ आणि भाग २ दोन्ही भरणे अनिवार्य असून विद्यार्थ्यांनी स्वतःचे गुण आणि महाविद्यालयांचे गेल्या वर्षीचे कट-ऑफ लक्षात घेऊनच माहिती काळजीपूर्वक तपासून अर्ज सबमिट करावा.
-प्राचार्य.बिभिषण माने