सोलापूर – लग्नात मानपान केला नाही , हुंडा दिला नाही , चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस घटस्फोट देण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती सह तिघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
सिध्देश्वर वर्रम- पती, पद्मावती वर्रम सासु, लिंगप्पा वर्रम- सासरे (सर्व रा. प्लॉट नं. ५१/३/७, सत्यसाई नगर, सोलापूर )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत प्रियांका ऊर्फ सुप्रिया सिध्देश्वर वर्रम, (वय- ३० वर्षे, रा. यल्लालिंग मठाजवळ, कर्णिक नगर, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी ही एप्रिल २०२५ ते दि. २७ एप्रिल २०२६ पर्यंत सासरी नांदत असताना
वरील आरोपीनी संसारउपयोगी सामान दिले नाही, सोने पैसे दिले नाहीत, योग्य तो मानपान केला नाही, तु माझ्या लायकीची नाही, घालुन-पाडुन बोलून अपमानित करुन, फिर्यादीचे चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ तसेच हाताने मारहाण करुन घटस्फोट देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार वाघमोडे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे .
Post Views: 9