धाराशिव – अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धाराशिव शहराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे दिला आहे.
दिलेल्या राजीनाम्यात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मला शहराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार ही जबाबदारी शिंदे यांनी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. ही जबाबदारी पार पाडताना शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खूप सहकार्य केले, मला प्रोत्साहित केले. याबद्दल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच काम करत असताना काही उणीवा राहिल्या असतील तर त्याची जबाबदारी पूर्णतः माझी आहे. तसेच यादरम्यान नकळतपणे कोणाचे मन दुखावले असेल तर मी क्षमा मागतो. तर सद्यस्थितीत माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे शहराध्यक्ष पदास मी योग्य न्याय देऊ शकत नाही. तसेच इतर कार्यकर्त्यांस ही या पदावर काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे यांनी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.























