शिवाजीनगर येथे घरासमोरील मोटार सायकल लंपास
सोलापूर : राहत्या घरासमोर लावण्यात आलेली ५० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल (क्र.एमएच-१३ ईएच-९८५६) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही चोरी २१ मे ते २२ मे दरम्यान शिवाजी नगर बाळे येथे
झाली. या बाबत जगदीशसिंग विक्रमसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार घुगे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीस
सोलापूर : राहत्या घरासमोर पार्क केलेली ४० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल (क्र.एमएच-१३ डीएच-२५०३) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही चोरी १९ ते २० मे दरम्यान जोडभावी पेठ जोडलिंग मारूती जवळ घडली. या प्रकरणी विवेक दशरथ सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार शितल शिवशरण हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
विवाहितेस क्रुर वागणूक देणाऱ्या पतीसह सहा जणांवर गुन्हा
सोलापूर: माहेरहून सोने व रुपये आण म्हणून विवाहितेस शिवीगाळ करून क्रुर वागणूक दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरूद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती-अमित राजमाने, सासू-शांता राजमाने, सासरे- विरपक्ष राजमाने, नणंद- स्वाती, तृप्ती, कपीन खानापुरे (सर्व रा. भवानी पेठ सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून याबाबत प्रज्ञा अमित राजमाने (वय ३३ रा. शिवसागर नगर शेळगी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी ही ९ मार्च २०२३ ते ५ मार्च २०२६ दरम्यान सासरी नांदत असताना वरील आरोपींनी माहेराहून सोने व रुपये आण या कारणावरून फिर्यादीस हाताने मारहाण करून, उपाशी पोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार येडे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
मोटर कार घेण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ – सांगोला येथील पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर: नवऱ्याला मोटार कार घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहीतेचा छळ केल्याप्रकरी सांगोला येथील पतीसह सासरच्या तिघांविरूद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती- अमोल सावंत, सासरे- मारूती सावंत, सासू- जयश्री सावंत (सर्व रा. नवी लोटवाडी ता. सांगोला) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून याबाबत ज्याेती अमोल सावंत (रा. आंबेडकर उद्यान जवळ सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी ही २०१५ पासून आजतागायत सासरी नांदत असताना वरील आरोपींनी तिला तु स्वयंपाक चांगला करत नाही.व घरातील किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली .वरील आरोपींनी शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देवून तिचा छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . तपास फौजदार येळे करीत आहेत.
Post Views: 6