Thursday, May 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवणार – सभापती संस्कृती सातपुते 

तरुण भारतbyतरुण भारत
May 28, 2026
in solapur
0
शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवणार – सभापती संस्कृती सातपुते 
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – ग्रामीण भागातील मागासवर्गीय, गरीब व गरजू मुला-मुलींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्याची तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एमएस-सीआयटी, टॅलीसह अन्य संगणक अभ्यासक्रम, टायपिंग तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी दिली. समाजकल्याण समितीची बैठक संपन्न झाली. बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
          यावेळी त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या स्पर्धेत सक्षम करण्यासाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डिजिटल युगात संगणक शिक्षणाला वाढती मागणी लक्षात घेता एमएस-सीआयटी, टॅली आणि इतर कॉम्प्युटर कोर्सेसद्वारे युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
         यासोबतच सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी टायपिंग प्रशिक्षण आणि पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन व शारीरिक प्रशिक्षण देण्याचाही प्रस्ताव आहे. ग्रामीण भागातील अनेक युवक आर्थिक अडचणींमुळे खासगी प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद स्तरावर प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले.
           ग्रामीण मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी ब्युटीपार्लर प्रशिक्षण देण्याचाही निर्णय विचाराधीन आहे. या प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील मुलींना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर युवकांसाठी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणही आयोजित करण्यात येणार असून, त्यातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
         अपंग व्यक्तींनाही स्वावलंबनाची संधी मिळावी यासाठी लघुउद्योग विषयक कार्यशाळा घेण्याचे नियोजन समाज कल्याण विभागाकडून करण्यात येत आहे. या कार्यशाळांद्वारे अपंग बांधवांना लघुउद्योग उभारणी, व्यवसाय व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
कोट
शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवणार
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गरीब व मागास घटकांतील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणे हेच समाज कल्याण विभागाच्या या उपक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यावर भर दिला जाणार आहे.
– संस्कृती सातपुते,सभापती समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर
 चौकट
अकलूजमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी
अकलूज येथे ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत नवीन वसतिगृह उभारण्यात यावे, अशी मागणी समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी केली आहे. यासाठी आवश्यक जागा व निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी वसतिगृहासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सातपुते यांनी दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
समाजकल्याण विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता
सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अधिकारी आणि कर्मचारी कमतरता भासत आहे. समाजकल्याण विभागाला पूर्ण वेळ समाजकल्याण अधिकारी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून, यासंबंधी जिल्हा परिषद आणि शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सीईओ कुशल जैन यांच्या दालनात या संबंधी चर्चा करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने निरीक्षक आणि ईतर कर्मचाऱ्यांची भरती देखील करण्यासंबंधी पाठपुरावा सुरू असल्याचे सभापती संस्कृती सातपुते यांनी सांगितले.
Post Views: 13
Previous Post

शिक्षक कै.राजेंद्र ढोले यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या

Next Post

सोलापूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची U-19 निवड चाचणी उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची U-19 निवड चाचणी उत्साहात संपन्न

सोलापूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची U-19 निवड चाचणी उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्याला केले जेरबंद #viral #solapurnews

May 28, 2026

पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला रीलस्टारचा संसार थेट केली आत्महत्या

May 28, 2026

पेट्रोल डिझेल चोरीबाबत थेटच बोलले जिल्हाधिकारी #solapurnews #viral

May 28, 2026
विश्वास’च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; अक्कलकोटमध्ये ८.४६ लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त

विश्वास’च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; अक्कलकोटमध्ये ८.४६ लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त

May 28, 2026

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पावसाळ्यात पुन्हा वनवास

May 28, 2026
रोटरीच्या मोफत आरोग्य शिबिरात ५६ नागरिकांची आरोग्य तपासणी

रोटरीच्या मोफत आरोग्य शिबिरात ५६ नागरिकांची आरोग्य तपासणी

May 28, 2026
राम गडकरी यांच्या जयंतीनिमित्त नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने अभिवादन

राम गडकरी यांच्या जयंतीनिमित्त नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने अभिवादन

May 28, 2026
पवित्र पोर्टल भरतीला ‘ब्रेक’, पण उमेदवारांसाठी संधी वाढणार?

पवित्र पोर्टल भरतीला ‘ब्रेक’, पण उमेदवारांसाठी संधी वाढणार?

May 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0883008

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697