
श्रीपूर – येथील आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक संकुलातील चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळेतील ६ कब विद्यार्थी व ६ बुलबुल विद्यार्थिनी यांना स्काऊट गाईड मधील कब चतुर्थ चरण राज्य पुरस्कार व बुलबुल हिरक पंख राज्य पुरस्कार जाहीर झाला असल्याचे मुख्याध्यापक शंकर यादव यांती सांगितले . महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य मुख्यालय मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र रामबाग भोर जिल्हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी परीक्षेत त्यांनी स्काऊट गाईड स्पर्धेत हे पुरस्कार मिळवले . यामध्ये आरुष सचिन जाधव,महारुद्र महेश पाटील, अमान अजीम शेख,अहेदआली अहमद डांगे, आफान समीर शिकलकर, फरहान नौशाद शिकलकर या कब विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय चतुर्थ चरण राज्य पुरस्कार तसेच रितिका विजयकुमार चव्हाण, अनुष्का सुजित घाडगे, अथश्री राजेश डांगे, श्रेया नवनाथ मुंडफणे, देवसेना अक्षय दीक्षित आणि स्वप्नाली सुनील हाटकर या सहा बुलबुल विद्यार्थिनींना हिरक पंख हा राज्य पुरस्कार प्राप्त झाला . पुढील वर्षी राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर नवी दिल्ली येथे मिळणार असल्याचेही यादव यांनी सांगितले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त मा.कादर शेख , सेक्रेटरी विठ्ठल ढेपे , यांनी यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले . शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामदास देशमुख, उपाध्यक्षा शुभांगीताई देशमुख,संचालक यशराज भैय्या देशमुख, संस्थेचे सचिव भारत कारंडे , संस्था विकास व व्यवस्थापन अधिकारी हनुमंत मोरे , यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांना लीडर करुणा धाईजे , जिल्ह्याचे ट्रेनिंग कमिशनर तसेच शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव यादव यांचे मार्गदर्शन लाभले .
Post Views: 18