सोलापूर : भाजपचे नगरसेवक दत्तात्रय नडगिरी यांचे शुक्रवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. नडगिरी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. तसेच ते सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक होते. जानेवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत ते प्रभाग 22 मधून भाजपकडून निवडून आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. रात्री नऊ वाजता त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Post Views: 14