Wednesday, June 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी, ख्वाजा बंदेनवाज क्लबचे शानदार विजय

तरुण भारतbyतरुण भारत
June 3, 2026
in sports
0
मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी, ख्वाजा बंदेनवाज क्लबचे  शानदार विजय
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – रेल्वेची  ​७९ व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत  मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी आणि ख्वाजा बंदेनवाज क्रिकेट क्लब यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शानदार विजय नोंदवले.

​सकाळच्या सत्रात पावसाच्या कारणास्तव ८-८ षटकांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात एस एस आय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने ८ षटकांत ६ बाद ८८ धावा उभारल्या. यात वैष्णव जावळेने ३०, सुमित येवलेने २२ तर विवेक अंचीने १६ धावांचे योगदान दिले. एस.एस.आय.कडून गोलंदाजीत निखिल दोरणाल व चेतन नराळ यांनी प्रत्येकी २ बळी, तर दीपक राजुल व मनीष यमुल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेला एस एस आय संघ ८ षटकांत ५ बाद ७४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून निखिल मादास (१६), समर्थ दोरणाल (१६) आणि निखिल दोरनाल (१२) यांनी संघर्ष केला. मॉडेल ॲकॅडमीच्या प्रथमेश राठोड व सुदेश राठोड यांनी प्रत्येकी २, तर आदर्श नागोजीने १ बळी घेत एस एस आयला रोखले. हा सामना मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने १४ धावांनी जिंकला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथमेश राठोडला वरिष्ठ खेळाडू राजा पटेल यांच्या हस्ते, आणि विक्रांत पवार, अंबादास तोरा, वासुदेव धोरणाल व वैभव इरावती यांच्या उपस्थितीत सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या सामन्यात मजहर मंगोली व चिराग शहा यांनी पंच म्हणून, तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.

​दुपारच्या सत्रात पावसाच्या व्यत्ययामुळे १५-१५ षटकांच्या झालेल्या दुसऱ्या सामन्यात मारिया क्रिकेट ॲकॅडमी, ठाणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ख्वाजा बंदे नवाज क्रिकेट ॲकॅडमीने वसीम बॅगच्या ७९ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर १५ षटकांत ६ बाद १५० धावांचा टप्पा गाठला. केदारनाथ आणि आदर्श राठोड यांनी प्रत्येकी १६ धावा केल्या. मारिया क्रिकेट क्लबतर्फे बाबूने ३, बाळाने २ तर जयप्रकाशने १ बळी घेतला. १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मारिया क्रिकेट क्लबचा डाव १५ षटकांत ८ बाद १२१ धावांवर मर्यादित राहिला. त्यांच्याकडून अभिषेकने ३०, बाबूने १७ आणि मीत घोळतने १६ धावा केल्या. ख्वाजा बंदेनवाज संघाकडून अष्टपैलू वसीम बेगने गोलंदाजीतही चमक दाखवत अवघ्या ५ धावांत ३ बळी टिपले, तर जाहिद पठाण आणि जकवान यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. हा सामना ख्वाजा बंदेनवाज क्रिकेट ॲकॅडमीने २९ धावांनी खिशात घातला. दमदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या वसीम बॅगला वरिष्ठ खेळाडू लियाकत शेख आणि राजा पटेल यांच्या हस्ते, व अतुल बांदोडकर आणि सचिन गायकवाड यांच्या उपस्थितीत सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्याचे पंच म्हणून महेश सोनवणे व युनूस खान यांनी, तर गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.

​उद्याचे सामने:

सकाळी : सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट ‘बी’ विरुद्ध श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब.

दुपारी :  खाजा बंदे नवाज क्रिकेट क्लब विरुद्ध कंपली प्रकाश क्रिकेट ॲकॅडमी

Post Views: 6
Previous Post

अधिक मास चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पखालपूर गणपतीसाठी बसेस सोडण्यात येणार

Next Post

युवकास पेट्रोल टाकुन पेटवून देवून जीवे ठार मारल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
युवकास पेट्रोल टाकुन पेटवून देवून जीवे ठार मारल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

युवकास पेट्रोल टाकुन पेटवून देवून जीवे ठार मारल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

ताज्या बातम्या

विवाहितेस माहेरी दिले हाकलून; वाचमेनला अज्ञातांकडून मारहाण

June 3, 2026

ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांचे दर कडाडले

June 3, 2026
५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

June 3, 2026
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

June 3, 2026

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १२ जुनला पेन्शन अदालत 

June 3, 2026

राजा भाऊंच्या तिकिटासाठी झेडपी अध्यक्षांची मुंबईवारी 

June 3, 2026

रुग्ण महिलेचे दागिने लंपास; बांबू व लाथा बुक्क्यांनी मारहाण

June 3, 2026
द.सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; पडताळणी समितीच्या निर्णयाने खळबळ

द.सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; पडताळणी समितीच्या निर्णयाने खळबळ

June 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0891398

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697