पंढरपूर – श्रीक्षेत्र पखालपूर गणपतीच्या दर्शनासाठी बस सोडव्यात या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मागणीनुसार संकष्टी चतुर्थी दिवशी पखालपूरसाठी बसेस सोडण्यात येतात अशी माहिती पंढरपूर आगार प्रमुख योगेश लिंगायत व जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
श्री क्षेत्र पखालपूर येथे प्राचीन,जागृत असे गणपतीचे मंदिर* आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे.त्याठिकाणी प्रत्येक महिन्यात चतुर्थी दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
तीन वर्षातून एकदा येणारा “अधिक मास चतुर्थी योग” बुधवार दि.३ जून २०२६ रोजी आलेला आहे.त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सकाळी सात पासून रात्रीपर्यंत श्रीक्षेत्र पखालपूर येथे जाण्या-येण्यासाठी जुन्या बस स्थानकापासून बससेवा सुरू करण्यात येत आहे तरी जाण्या-येण्यासाठी जेष्ठ नागरिक,महिला प्रवाशी भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख योगेश लिंगायत,स्थानक प्रमुख अंकुश सरगर,वाहतुक नियंत्रक मोहन शिंदे,अप्पा अष्टेकर,ग्राहक पंचायतीचे सदस्यांनी केले आहे.
Post Views: 6