
बार्शी – दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी १.४५ वा.चे सुमारास भालेकर पाटीजवळ देवगांव येथे फिर्यादी त्याचे मित्र अमजद मुलाणी, भिका मांजरे व आरोपी वसंत बाबू मांजरे रा. देवगांव, ता. बार्शी हे सर्व गप्पा मारत बसले असताना आरोपी तेथून निघून गेला व थोड्या वेळाने परत येऊन आरोपीने पाण्याच्या रिकाम्या बाटलीत पेट्रोल घेवून येऊन मागील भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीच्या डोक्यावर बाटलीतील पेट्रोल ओतून काडीपेटीची काडी ओढून अंगावर टाकून पेटवून दिले. त्यावेळी फिर्यादीस त्याचे मित्रानी उपचारासाठी बकरे हॉस्पीटल बार्शी येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान यातील फिर्यादी धर्मराज विठठल मांजरे, वय ३० वर्षे हा दि. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी मयत झाला. यातील आरोपीविरुध्द पांगरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२५०/२०१७ नुसार भादंवि. कलम ३०७, ३०२, ३२४ अन्वये दि. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी वसंत बाबु मांजरे हा गुन्हा घडलेपासून सुमारे ४ वर्षे फरार होता. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेवन सदर आरोपीस लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील पाडळी, ता. खंडाळा, जि. सातारा येथून आरोपीस अटक करुन सबळ पुरावा गोळा करुन आरोपीविरुध्द सदर गुन्हयाचा प्रथम तपास सपोनि. डी. एस. ढोणे, पो.उपनिरीक्षक संतोष बडे यांनी करुन उर्वरीत तपास पो.उपनिरीक्षक अमोल ननवरे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्यावतीने सदर गुन्हा शाबितीसाठी १६ साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादीने मृत्यपूर्व दिलेला जबाब व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे कोर्टासमोर झालेले जबाब व घटना एकमेकास पूरक होत्या. त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. तपास अधिकारी यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे व नेत्र साक्षीदार यांचे जबाबाच्या अनुषंगाने मे. कोर्टासमोर आलेला पुरावा या सर्व बाबी सहा.सरकारी वकील ॲड. आनंद गोरे यांनी मे. कोर्टासमोर मांडला. कोर्ट पैरवी पोकॉ. १५०५ प्रभाकर गायकवाड यांनी साक्षीदार यांना कोर्टासमोर हजर ठेवून योग्य साक्ष देण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले.
सरकार पक्षाचेवतीने युक्तीवाद करण्यात आला की, आरोपीने फिर्यादीचे अंगावर पेट्रोल ओतून पेटवून जिवे ठार मारले. सदर बाब सरकार पक्षाचे युक्तीवादामध्ये निदर्शनास आणून देण्यात आली व सरकार पक्षाच्या युक्तीवादाला सहाय्यक म्हणून मा. ना. सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले देण्यात आले.
सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. मलकालपट्टे रेड्डी मॅडम यांनी आरोपी यास भादंविक ३०२ अन्वये दोषी धरुन जन्मठेप व ५,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद गोरे व ॲड. शिवाजी होटकर यांनी काम पाहिले.
सदर केसमध्ये अंजना कृष्णा व्ही. एस., सहा. पोलीस अधीक्षक, अति. कार्यभार बार्शी उपविभाग व साईनाथ सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी साक्षीदार यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. सदर गुन्हयाचा तपास सपोनि. डी.एस. ढोणे, पो.उपनिरीक्षक संतोष बडे, पो.उपनिरीक्षक अमोल ननवरे यांनी केलेला होता. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोकॉ. १५०५ प्रभाकर गायकवाड यांनी काम पाहिले.
Post Views: 6