सांगोला – लोणारी समाजाच्या मागण्या संदर्भात आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विकास विभागाचे मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले.
विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारची कर्जे घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना अर्ज प्रणालीमध्ये लोणारी समाजाचे नाव व जात क्रमांक १८३ उपलब्ध नसणे तसेच कर्ज योजनामधील जाचक अटी व अपुरी कर्ज मर्यादा यामुळे अनेक पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहत आहेत. तरी ऑनलाइन प्रणालीमधील लोणारी समाजाचे नाव व जात क्रमांक १८३ समावेश करावा, कर्जाची मर्यादा वाढवावी, अल्प कर्जासाठी दोन जामीन दाराची अट शिथिल करावी, शासकीय सेवक व ८ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या जामीनदाराची अट हटवावी तसेच ग्रामीण भागातील युवक, महिला व उद्योजकांना सुलभ निकषांवर कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्री अतुल सावे यांच्याकडे आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
Post Views: 11