सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील संशोधन व विकास कक्ष अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च, पब्लिकेशन अँड एथिक्स या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ.सोमनाथ ठिगळे यांनी संशोधन लेखनाची रचना, संदर्भ शैली तसेच रेफरन्स मॅनेजमेंट टूल्सचा प्रभावी वापर तर डॉ.आशिष जोशी यांनी आय ईईई, स्प्निनंगर, सायन्स डायरेक्टर यांसारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन डेटाबेसचा वापर, योग्य जर्नलची निवड, इम्पॅक्ट फॅक्टर तसेच स्कोपस इंडेक्सिंगची ओळख आणि निकष यावर मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांनी तज्ज्ञांशी संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संशोधन व विकास कक्ष प्रमुख डॉ.सोमनाथ ठिगळे, आय.क्यू.एसी समन्वयक प्रा.गणेश मिसाळ, आय.आय.सी समन्वयक प्रा.जगदीश हल्लूर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेस पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक तसेच प्राध्यापक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संशोधन हे केवळ नवीन ज्ञाननिर्मितीचे साधन नसून ते समाजाच्या प्रगतीसाठी जबाबदार आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. संशोधकांनी आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करून संशोधन करणे, योग्य संदर्भ देणे आणि नैतिकतेच्या चौकटीत राहून ज्ञाननिर्मिती करणे गरजेचे असुन दर्जेदार संशोधनामध्ये नैतिकतेचे महत्त्व आवश्यक आहे.
– डाॅ.विद्याराणी क्षीरसागर
Post Views: 17