सोलापूर – कुमार व मुली गटाच्या ५२व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुमार गटात धाराशिवने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावीत हॅटट्रिक केली आहे. मुलींच्या गटात सांगलीने आपले विजेतेपद कायम ठेवले आहे.
लघुत्तम आक्रमणद्वारे झालेल्या सामन्यात कुमार गटात सोलापूर तृतीय, पुणे चतुर्थ तर मुली गटात धाराशिव तृतीय व सोलापूरने
चतुर्थ स्थान संपादिले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ‘विवेकानंद’ व ‘सावित्री’ पुरस्काराचे मानकरी अनुक्रमे राज चंद्रजित जाधव (धाराशिव) व धनश्री विठ्ठल तामखडे (सांगली) हे ठरले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर पार पडली.
कुमार गटातील अंतिम सामन्यात धाराशिवला मुंबई उपनगरवर ३२-२६ असे ६ गुण व २. ५० मिनिटे राखून नमविताना विशेष प्रयास करावे लागले नाहीत. मध्यंतरासच त्यांनी दोन ड्रीम गुणासह १८-१२ अशी निर्णय आघाडी घेतली होती.
मुलींच्या गटात सांगलीने आपल्याकडे विजेतेपद कायम राखताना २७-१९ असे ८ गुण व ३. ५० मिनिटे राखून धाराशिववर मात करण्यात यश मिळविले. मध्यंतरापर्यंत धाराशिवने कडवी लढत दिली. दोन्ही संघांनीही प्रत्येकी तीन ड्रीम रन मिळवीत ११-११ अशी बरोबरी करीत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. परंतु मध्यंतरानंतर सांगली ने बहारदार खेळी करीत संघाचा विजय सुकर केला.
——
या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकेचे मानकरी
कुमार : संरक्षक : जितेंद्र धर्मसिंग वसावे (धाराशिव), आक्रमक : समर्थ संजय सावंत ( मुंबई उपनगर), अष्टपैलू : राज चंद्रजीत जाधव (धाराशिव).
मुली : संरक्षक : धनश्री प्रकाश कंक (ठाणे) आक्रमक : अनुष्का आबासो खाडे (सांगली). अष्टपैलू : धनश्री विठ्ठल तामखडे : सांगली.
———-
अंतिम सामन्यातील संरक्षण व आक्रमणातील वैयक्तिक कामगिरी :
कुमार: धाराशिव : वीरसिंग पाडवी(१.१०, १.१० मि.), जितेंद्र वसावे(३.२० मि व ८ गुण ), महेश पाडवी(१.४० मि.व २ गुण ), भिमसिंग वसावे (१.१०), राज जाधव (१.२०, २.१० मि. व २ गुण ), हरद्या वसावे (१.५० व ८ गुण ), सोट्या वळवी (१. २० नाबाद व ६ गुण ), पिंटू वळवी (२ गुण ).
मुंबई उपनगर : आर्यन चव्हाण(१.४० मि.), साहिल वासनिक(१.४०, १.०० मि. व २ गुण), सचिन सहानी (१.१० मि. ४ गुण ), अमेय मुर्चावडे (२ गुण), समर्थ सावंत (१.५० मि. व १० गुण), आदेश राठोड (१. ५० मि. व ८).
———
मुली : सांगली: वैष्णवी चाफे (२.४० मि. व २ गुण ), श्रावणी तामखेडे (२.१६ मि. व २ गुण), वेदिका तामखेडे (२.१० मि.), विद्या तामखेडे (१.१० मि.), अनुष्का तामखेडे (८ गुण ), धनश्री तामखेडे (२.१० मि. व ४ गुण), कृतिका आहेर (२.३०मि.), भौरम्मा उडगी(१. ४०मि. व २ गुण), पायल तामखेडे (१.५४ मि. व २ गुण).
ठाणे : प्राची वानगडे (१.०० मि.), स्वरा साळुंखे (१.२० मि.), धनश्री कंक (१.५० मि. ८ गुण), श्रुती चोरमुले (२ गुण), प्रणिती जगदाळे (२.२०, १.०० व २ गुण), गुड्डी राठोड(२.३० मि.), निधी जाधव (१.५० व ४ गुण ).




















