वळसंग – तालुका दक्षिण सोलापूर येथे श्री मद्विविरशैव देवसाली हटगार(कोष्टी) समाज कडून श्री.ष.ब्र.अभिनव रेवणसिध्द पट्टदेवरु गुरुहिरेमठ, मैंदर्गी यांच्या दिव्यसानिध्यत आदर्श व्यक्तींना भव्य सत्कार करण्यात आले.प्रथमतः देवी श्री चौडेश्वरी मातेची पूजा करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. निवृत्त अधिकारी एलआयसी धानप्पा कण्णगी यांच्या हस्ते श्री.ष.ब्र.अभिनव रेवणसिध्द पट्टदेवरु यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी(उपमहासंचालक यशदा, पुणे) तर प्रमुख पाहुणे म्हणून पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते.समाज बांधव कडून निवृत्त एल.आय.सी अधिकारी धानप्पा सन्मुखप्पा कण्णगी त्यांचे जीवन व त्यांच्या कामाची प्रामाणिकता गुणगान करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कोष्टी समाज कडून विकास रत्न २०२६ चे पुरस्कार मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशोदा पुणे व पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना देऊन सत्कार करण्यात आले. सोलापूर नगरसेविका राजश्री धोडमनी, पंचायत समिती उपसभापती वर्षा पटणे, मैंदर्गी नगरसेविका सुरेखा होळीकट्टी, भौरम्मा गुंडद, मैंदर्गी नगरसेवक शिवचलप्पा मुनोळी, वळसंग पंचायत समिती सदस्य बलवान गोतसुर्वे, दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आले.त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, बोरामणी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे,सो.जि. अभियंता राजेश जगताप, एलआयसी अधिकारी प्रशांत पाटील, सुरेश हिप्परगी याही मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
गुणवंत व आदर्श व्यक्तींना सत्कार झाल्यानंतर प्रीती भोजन कार्यक्रम आयोजित केले होते या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समस्त हटगार(कोष्टी) समाज, श्री रामलिंग चौडेश्वरी देवस्थान ट्रस्ट, एस.आर.सी.तरुण मंडळ वळसंग यांनी परिश्रम घेतले.