मोहोळ – तू बीजेपी मध्ये राहून आमचे विरुद्ध काम केला, तुला आज खल्लास करून टाकतो तुला लय मस्ती आली आहे असे म्हणत रॉडने बांबूने लाथाबुक्याने मारहाण केली म्हणून ६ जणांवरमोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ येथील बागवान नगर मध्ये राहणारे अकबर आलम फरास यांची पत्नी दूध वाल्याकडून दूध आणण्यासाठी गेली असता त्यांच्या घरासमोर राहणारे रफिक उर्फ इमाम शेख यांनी तुझ्या मुलींनी माझे अंगावर तीन दिवसांपूर्वी पाणी शिंपडले होते. तुझे मुलींना नीट संभाळता येत नाही असे म्हणून शिवीगाळ केली याबाबत त्यांनी त्यांचे पतींना याबाबत सांगितले फिर्यादी अकबर आलम फरास हे जाब विचारण्यासाठी गेले असता घरासमोरील रोडवर रफिक उर्फ इमाम शेख अक्रम इमाम शेख हे थांबले होते. त्यांनी तू आज बरा सापडला,तुला आज खल्लासच करतो. तू बीजेपी मध्ये राहून आमचे विरुद्ध काम केला तुला मस्ती आली तुला मस्ती आली असे म्हणत फोन करून जीब्राइल बाबाजान शेख, बिलाल बागवान शेख व अनोळखी दोन लोकांना बोलावून घेतले. आणि रॉड, बांबू आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पडलेले दगड उचलून डोक्यात मारले. पत्नी हिना कौशल व शेजारील महिला सोडवण्यास आल्या असताना सर्वांनी मिळून त्यांनाहीलाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात रफिक उर्फ इमाम शेख, जिब्राईल बाबाजान शेख, अक्रम इमाम शेख, बिलाल बाबाजान शेख व इतर दोन अनोळखी अशा सहा जनावर गुन्हा करण्यात आला आहे
Post Views: 9