
सोलापूर – राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणे, सोलापूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम आमदार विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी व्हावे, असे मत आमदार विजय देशमुख यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष सुरेश बिराजदार, नगरसेवक अविनाश पाटील, ज्ञानेश्वर कारभारी, बसवराज इटकळे, संजय कणके, राजेश दिड्डी, सतीश भरमशेट्टी आदी महिला, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















